Husband and Wife Clash Goa Crime News
Husband and Wife Clash Goa Crime News Saam TV
देश विदेश

Goa Crime News: पती नव्हे हैवान! मित्राला घरी बोलावून पत्नीसोबत केलं भयानक कृत्य

साम टिव्ही ब्युरो

Husband and Wife Clash: पती-पत्नीचा वाद होणं ही काही नवीन बाब नाही. संसाराचा गाडा हाकताना पती-पत्नीमध्ये अगदी छोट्या-छोट्या गोष्टीवरून वाद होत असतात. अनेकदा हे वाद लगेच मिटतात, तर काही वेळा ते विकोपाला जातात. यातून पुढे गुन्हेगारीच्या मोठ्या घटना घडतात. अशीच एक घटना गोव्यातून समोर आली आहे.

दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडीत एका हैवान पतीने मित्राच्या मदतीने आपल्याच पत्नीची गळा आवळून हत्या केली. विशीता नाईक (वय ३५, रा. म्हापसा- गोवा) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. हा प्रकार मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास उघड झाला आहे.

याप्रकरणी पतीसह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. विनोद मनोहर नाईक (मुळ रा. वास्को-गोवा सध्या रा. म्हापसा) व ऋतुराज श्रावण इंगवले (मुळ रा. चंदगड-कोल्हापूर सध्या रा.म्हापसा-गोवा) अशी त्यांची नावे आहेत. गेले अनेक दिवस पती-पत्नीत वाद होते. त्यातून हा प्रकार घडला असावा, असा संशय उपविभागीय पोलीस अधिकारी रोहिणी सोळंके यांनी व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत महिला विशीता नाईक सोमवार रात्रीपासून बेपत्ता होती. दरम्यान, दोडामार्ग तालुक्यातील तिळारीजळच्या भटवाडी येथे तिचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळाल्यानंतर दोडामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

घटनास्थळी मिळालेल्या काही पुराव्यानुसार त्यांनी पतीसह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीअंती दोघांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. पती-पत्नीचे पटत नसल्यामुळे पूर्वनियोजित कट करून पतीने हा प्रकार केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

पत्नीची हत्या करण्यासाठी पतीने आधी मित्राला घरी बोलावले. त्यानंतर मित्राच्या सहाय्याने त्याने पत्नीचा गळा आवळला. हैवान पती इतक्यावरच थांबला नाही, तर त्याने दगडाने ठेचून तिची हत्या केली. हत्येनंतर मृतदेह फेकून दिला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vastu Tips: घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर 'श्री' का लिहतात? हे फायदे वाचा

Balasaheb Thorat: कृपा करा; ३ लाखाच्या लीडची चर्चा करु नका... बाळासाहेब थोरातांचा ठाकरेंच्या उमेदवाराला सुचक सल्ला

NCP News: मजबुरीही नाही, तडजोड तर बिलकुलच नाही! Ajit Pawar यांचं मोठं विधान

PM Modi Sabha in Madha: ....म्हणून त्या नेत्याची इथून निवडणूक लढवण्याची हिंमत नाही; PM मोदी कुणावर बरसले?

Chhatrapati Sambhajinagar | विद्यापीठात PF घोटाळा ? नेमका विषय काय?

SCROLL FOR NEXT