Crime News Saam TV
देश विदेश

Crime News : लहान दीराकडून वहिनीचं अपहरण; मित्रासोबत मिळून केला अत्याचार, काळीमा फासणारी घटना

एका लहान दीराने मित्रासोबत मिळून आपल्याच वहिनीवर बलात्कार केला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Madhya Pradesh Crime : देशात महिला अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशातच मध्यप्रदेशातून एक संतापजक घटना उघडकीस आली आहे. एका लहान दीराने मित्रासोबत मिळून आपल्याच वहिनीवर बलात्कार केला. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक देखील केली आहे. (Latest Marathi News)

मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) इंदुर शहरात ही संतापजक घटना घडली. प्राप्त माहितीनुसार, २९ वर्षीय पीडित महिला लसूडिया पोलीस स्टेशन परिसरात राहते. या महिलेचा पती हा परराज्यात नोकरीला आहे. मंगळवारी (२७ डिसेंबर) पीडित महिला काही कामानिमित्त बाहेर गेली होती.

त्यामुळे रात्री घरी येण्यास तिला उशीर झाला. हायवेवरून गावात जाण्यासाठी काही वाहन नसल्याने पीडित महिला ही वाट बघत थांबली होती. यावेळी महिलेचा दीर आणि त्याचा मित्र रिक्षातून तेथे आले. वहिनी तुम्हाला घरी सोडतो असं म्हणत त्याने महिलेला रिक्षात बसवलं.

दरम्यान, वहिनीला एकटं बघून दीराची नियत फिरली. त्याने वाटेत रिक्षा थांबवत वहिनीला रस्त्यालगतच्या एका शेतात नेलं. तेथे मित्रासोबत मिळून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार (Crime News)  केला. आरोपी दीर इतक्यावरच थांबला नाही, तर त्यांने वहिनीला रात्रभर आपल्यासोबतच ठेवलं.

आरोपी दीर हा मित्रासोबत मिळून रात्रभर वहिनीवर बलात्कार करत राहिला. जेव्हा सकाळ झाली तेव्हा वहिनीला नग्न अवस्थेत तेथेच सोडून आरोपीने पळ काढला. या घटनेनंतर पीडित महिला प्रचंड तणावात गेली.

तिने या घटनेची माहिती आपल्या पतीपासून लपवली. मात्र, पत्नी नैराश्यात असल्याचं बघून पतीने तिची फोनवरून विचारणा केली. तेव्हा पीडित महिलेने आपल्यावर बलात्कार झाला असल्याचं पतीला सांगितलं.

लहान भावानेच आपल्या बायकोवर बलात्कार केल्याचं समजताच मोठ्या भावाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तातडीने इंदुर गाठत पत्नीला घेऊन भावाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी आरोपी दीरासह त्याच्या मित्राला अटक केली आहे. या घटनेनं परिरातून संताप व्यक्त केला जात आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट प्रकरणातील आरोपी मनिषा वाघमारेला "वर्टिगो" आजार

Gautami Patil-Bhau Kadam : 'हिल हिल पोरी हिला...'; गौतमी पाटील अन् भाऊ कदम यांच्या केमिस्ट्रीची जादू, पाहा Unseen Photo

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात 92% ते 283% पर्यंत वाढ होणार? सरकार किती वाढवणार फिटमेंट फॅक्टर? वाचा...

कांदा भजी खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा फणसाची भजी, सोपी रेसिपी

LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर ६५८ रुपयांनी स्वस्त मिळतोय, १०.५८ कोटी कुटुंबांना ९५८ रुपयांचा बंपर फायदा, पाहा नेमकं गणित

SCROLL FOR NEXT