How was Operation Sindoor planned Saam Tv News
देश विदेश

Operation Sindoor : ऑपरेशन 'सिंदूर'चा कसा आखला प्लॅन? वाचा थोडक्यात...

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल १६ दिवसांनी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकमधील दहशतवादी अड्डे उध्वस्त केलेत. मात्र या ऑपरेशनचं प्लॅनिंग कसं केलं? हे ऑपरेशन गुप्तपणे सीमा भेदून कसं राबवलं? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Prashant Patil

सुप्रीम मस्कर, साम टीव्ही

नवी दिल्ली : भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'ने पाकला बेचिराख करून टाकलंय. एकामागून एक होणाऱ्या हवाई हल्ल्यानं मध्यरात्री पाकमधील दहशतवाद्यांना सैरावैरा पळायला भाग पाडलं. पाकिस्तानच्या सीमेतील ९ ठिकाणांवरील या 'ऑपरेशन सिंदूर'नं कित्येक दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. भारतानं पाक सीमेच्या १०० किलोमीटर परिसरात हा विध्वसंक हल्ला घडवून आणला. मात्र या हल्ल्याचं नियोजन नेमकं कसं आखलं गेलं. पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना १६ दिवस भारतानं कशा संयमानं आणि गुप्तपणे ही रणनिती आखली, पाहूयात.

'ऑपरेशन सिंदूर' पाकवर नियोजनपूर्वक हल्ला

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे 'ऑपरेशन सिंदूर'ची जबाबदारी

पाकमधील लष्करी आणि दहशतवादी कारवायांची माहिती मिळवली

पंतप्रधान मोदी यांच्या निर्देशानंतर अचूक हल्ले करण्याचे नियोजन

राष्टीय तांत्रिक गुप्तचर संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका

अंतिम योजनेवरील चर्चेसाठी अजित डोभाल आणि पंतप्रधानांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंजुरी

विशेष कंट्रोल रूमची उभारणी

इशारा मिळताच भारतीय फाईटर जेट्स झेपावले

रात्री १२.३७ वाजता क्षेपणास्त्र डागली

हल्ल्यात दहशतवाद्यांच्या ९ ठिकाणं उद्ध्वस्त

ऑपरेशन सिंदूर यशस्वी

देशात मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आल्यानंतर अचानक भारतानं नियोजनपूर्वक पाकवर 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून जोरदार हल्ला केला. काश्मीरमध्ये माता- भगिनींच्या कपाळावरचं कूंकू पुसलं गेल होतं. मात्र आता पाकवर हल्ला करून दहशतवाद्याच्या रक्तानं पीडितांच्या कुंकवाचा बदला घेतला गेलाय. त्यामुळे भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान गर्भगळीत झाल्याचं दिसतयं. आता भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणायचा विचार जरी मनात आला तरी पाकला 'ऑपरेशन सिंदूर' नेहमीच आठवत राहिल, हे निश्चित.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

Akola News: बापरे! महिला 50% होरपळली; एकनाथ शिंदेंचा थेट पोलीस अधीक्षक आणि माजी आमदारांना फोन; नेमकं काय आहे प्रकरण?

शेतकरी पाण्यात, जिल्हाधिकारी मग्न नाचगाण्यात, जिल्हाधिकाऱ्याचा प्रताप, नागरिकांचा संताप

Damage Lungs: खराब फुफ्फुसांचे आरोग्य सुधारण्यासाठी खा 'हे' पदार्थ, ठरतील गुणकारी

SCROLL FOR NEXT