Cibil Score Increase Tips 
देश विदेश

CIBIL Score: क्रेडिट/सिबिल स्कोअर कमी? बँक कर्ज देत नाही? या ५ टीप्सने सिबिल स्कोअर वाढेल

Credit Score Tips for Loan Approval: जर सिबिल स्कोअर कमी असेल तर, बँकांकडून लवकर कर्ज मिळत नाही. जर आपल्याला सिबिल स्कोअर वाढवायचा असेल तर, आपण काही टिप्स फॉलो करू शकता.

Bhagyashree Kamble

आजकाल बहुतांश लोक कर्ज घेतात. कर्ज आपण सहसा नवीन घर खरेदी करण्यासाठी किंवा मुलाच्या शिक्षणासाठी घेतो. अशावेळी लोक बँकांमध्ये धाव घेतात आणि कर्जासाठी अर्ज करतात. बँक कर्ज प्रक्रिये सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट कार्ड स्कोअर तपासून देते. कर्जासाठी सिबिल स्कोअर किंवा क्रेडिट कार्ड स्कोअर खूप महत्वाची भूमिका बजावतात.

सिबिल स्कोअर उत्तम असेल तर, कर्ज मंजूर होण्यास वेळ लागत नाही. जर सिबिल स्कोअर कमी असेल तर, बँकांकडून लवकर कर्ज मिळत नाही. जर आपल्याला सिबिल स्कोअर वाढवायचा असेल तर, आपण काही टिप्स फॉलो करून पाहू शकता.

क्रेडिट रिपोर्ट तपासा

क्रेडिट रिपोर्टची एक कॉपी घ्या. क्रेडिट रिपोर्टची कॉपी काळजीपूर्वक वाचा. तुमचा सिबिल स्कोअर कमी करणाऱ्या काही चुका, चुकीची माहिती किंवा काही फसवणूक आहे का? हे तपासा.

वेळेवर बिले भरा

उशिरा पेमेंट केल्यानं तुमच्या सिबिल स्कोअरवर खूप नकारात्मक परिणाम होऊ शकतो. तुमची सर्व बिले, मग ती क्रेडिट कार्ड बिल असो, कर्जाचा ईएमआय असो किंवा वीज बिल असो, वेळेवर भरा. यामुळे सिबिल स्कोअरवर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही.

क्रेडिट कार्ड कमी वापरा

तुमच्या क्रेडिट मर्यादेच्या ३०% पेक्षा कमी वापरण्याचा प्रयत्न करा. याचा अर्थ असा की क्रेडिट कार्डचा वापर कमी करा. जास्त क्रेडिट कार्ड वापरल्याने सिबिल स्कोअरवर परिणाम होऊ शकतो.

क्रेडिटमध्ये विविधता आणा

क्रेडिट कार्ड, कर्ज आणि गृहकर्ज यासारख्या विविध प्रकारच्या क्रेडिटचा वापर करा. क्रेडिटमध्ये विविधता आणा. यामुळे सिबिल स्कोअर सुधारू शकतो. पण जबाबदारीने परतफेड करता येईल तितकेच क्रेडिट घ्या.

तज्ज्ञांची मदत घ्या

जर तुमचा सिबिल स्कोअर खराब झाला असेल तर, आर्थिक सल्लागार किंवा क्रेडिट कौन्सिलरची मदत घ्या. सल्लागाराच्या सल्ल्यानुसार आपण आपलं क्रेडिट स्कोअर किंवा सिबिल स्कोअर सुधारू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : भयंकर! सून घरात एकटीच, सासरा आणि २ दीर छप्पर तोडून घरात घुसले ; पुढे जे घडलं त्याने पायाखालची जमीन हादरली

Amboli WaterFalls : पावसाळ्यात एकदा तरी पाहाच आंबोलीतील 'हे' ठिकाण, जिथे धबधब्याचे पाणी खाली नव्हे तर वर उडते

Mumbai News : अभिनेत्याने केला १६ वर्षीय मुलीचा लैंगिक छळ, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Maharashtra News Live Update:पाकिस्तानी गुंडांशी संपर्काच्या संशयाने कोल्हापुरातील दोघे चौकशीसाठी ताब्यात

Maharashtra rain: राज्यात मान्सूनला मोठा ब्रेक; 'या' कारणामुळे गायब झाले ढग, हवामान खात्याचा नवीन अंदाज काय?

SCROLL FOR NEXT