लखीमपूर खेरी हिंसाचारा प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रांना डेंग्यूची लक्षणे Saam Tv
देश विदेश

लखीमपूर खेरी हिंसाचारा प्रकरणातील आरोपी आशिष मिश्रांना डेंग्यूची लक्षणे

केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : उत्तर प्रदेश मधील लखीमपूर खेरीमध्ये ३ ऑक्टोबर दिवशी झालेल्या हिंसाचार प्रकरणी अटक केलेला केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. शेतकरी आंदोलन करत असतानाच, त्यांच्यावर वाहने घालण्यात आल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला आहे. त्यावेळी झालेल्या हिंसाचारात ४ शेतकऱ्यांसह ८ जण ठार झाले होते. उत्तर पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण शाखेने आशिष मिश्रा याची सुमारे १२ तास चौकशी केल्यावर त्याला अटक करण्यात आली होती.

हे देखील पहा-

आशिष मिश्राच्या पोलीस रिमांडकरिता न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अर्ज दाखल झाल्यावर त्यास १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आता, आशिष मिश्रा यास रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक आणि याप्रकरणाचा तपास करणाऱ्या टीमचे सदस्य अरुण कुमार सिंह यांनी आशिष मिश्रा यांना डेंग्यूची लक्षणे असल्याचे सांगितले आहे. तसेच, ताप आणि डेंग्यूसदृश्य लक्षणे असल्यामुळे त्यांचे सँपल तपासणीकरिता पाठविण्यात आले आहे.

आशिष यांनाही वैद्यकीय तपासासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे सिंह यांनी यावेळी सांगितले आहे. दरम्यान, लखीमपूर खेरीमध्ये ज्या वाहनांखाली चिरडून शेतकरी ठार झाले आहेत, त्यापैकी एका वाहनात आशिष मिश्राही होता असा आरोप आहे. याप्रकरणी गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशिष यांच्यासह १३ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT