Honduras Jail News Saam tv
देश विदेश

Honduras Jail News : होंडुरासमधील महिलांच्या तुरुंगात दोन गटात तुंबळ हाणामारी; 41 कैद्यांचा होरपळून मृत्यू

Honduras Jail News : महिलांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात कैद्यांचा जळून मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

Honduras Jail : मध्य  अमेरिकेतील होंडुरासमधील महिलांच्या तुरुंगात मंगळवारी झालेल्या हाणामारीत 41 महिला कैद्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. अवैध कामांवरुन महिलांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हिंसाचारात कैद्यांचा जळून मृत्यू झाला.

होंडुरासच्या राष्ट्रीय पोलीस तपास संस्थेचे प्रवक्ते युरी मोरा यांनी सांगितले की, बहुतेक कैद्यांचा मृत्यू हा होरपळून झाला आहे. तर इतरांना गोळ्या घालण्यात आल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गोळीबार आणि चाकूच्या हल्ल्यात जखमी झालेल्या किमान सात महिला कैद्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.  (Marathi Tajya Batmya)

तुरुंगांमधील बेकायदेशीर कृत्यांवर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांनी अलीकडे केलेल्या प्रयत्नांमुळे हा वाद सुरु झाला. त्यामुळे मंगळवारी कारागृहात हिंसाचार झाला. कारागृहातील संघटित टोळ्यांविरोधात पावले उचलली जात असल्याचे कारागृह प्रशासाने सांगितले. (Latest Marathi News)

होंडुरासमधील तुरुंगाची अवस्था अत्यंत वाईट आहे. येथे कैद्यांची संख्या मर्यादेपेक्षा जास्त आहे. जेलमध्ये अत्यंत अस्वच्छता आहे. अनेकदा येथील तुरुंगात हाणामारीच्या घटना घडत असतात. 2019 मध्येही अशाच प्रकारच्या हिंसाचारात 37 कैद्यांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart attack risk: दररोजच्या या ५ सवयी तुमच्या हृदयाला पाडतायत आजारी; डॉक्टरांनी सांगितलं कशी घ्याल काळजी?

Ladki Bahin Yojana: e-KYCमध्ये ८६ लाख लाडक्या बहिणी अपात्र,₹१५०० कायमचे बंद, इतक्या महिलांनाच मिळणार लाभ

Maharashtra Live News Update : गोरेगावमध्ये कार व बेस्ट बसची समोरासमोर धडक, अपघातात चालक जखमी

Ayesha Khan : 'धुरंधर'च्या यशामुळे मोठ्या चित्रपटाची लॉटरी, अक्षय कुमारसोबत दिसणार 'शरारत' फेम आयशा खान

Gold Rate Today: सराफा बाजार उघडताच सोन्याची किंमत बदलली, वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

SCROLL FOR NEXT