Rising Hollywood Actress Dies Young Due to Charcot-Marie-Tooth Syndrome Saam
देश विदेश

धक्कादायक! वयाच्या २३व्या वर्षी अभिनेत्रीने सोडले प्राण; 'या' गंभीर आजारामुळे मृत्यू, सिनेसृष्टीत हळहळ

Rising Hollywood Actress Dies Young Due to Charcot-Marie-Tooth Syndrome: इसाबेल टेटचं वयाच्या २३व्या वर्षी निधन. दुर्मिळ आजारामुळे सोडले प्राण. हॉलिवूड सिनेसृष्टीतून शोक व्यक्त.

Bhagyashree Kamble

हॉलीवूड सिनेसृ्ष्टीतून दुख:द बातमी समोर येत आहे. '9-1-1: नॅशव्हिल' या लोकप्रिय मालिकेतून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री इसाबेल टेटचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वयाच्या २३ व्या वर्षी अभिनेत्रीनं अखेरचा श्वास घेतला. अभिनेत्री दुर्मिळ आजाराशी त्रस्त होती. याच आजारामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला. अभिनेत्रीच्या अचानक निधनानंतर इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.

इसाबेल टेटच्या निधनाचे वृत्त टॅलेंट एजन्सी, मॅकक्रॅ एजन्सीने दिली. त्यांनी याची माहिती समाजमाध्यमांवर शेअर केली. त्यांनी फोटो शेअर करून कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'तिनं ज्या पहिल्या मालिकेसाठी ऑडिशन दिलं होतं, त्या भूमिकेसाठी तिचं सिलेक्शन झालं. कमी वेळात कमी वयात तिला प्रसिद्धी मिळाली'.

एजन्सीनं टेटची आई, बहीण, कुटुंब आणि मित्रांप्रति शोक व्यक्त केला आहे. इसाबेलच्या मृत्यूचं कारण दुर्मिळ आजार असल्याचं म्हटलं जात आहे. शार्कोट मॅरी टूथ (CMT) हा आजार अभिनेत्री झाला होता. माहितीनुसार, हा आजार एक दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. जे स्नायूंना नियंत्रित करणाऱ्या नसांवर परिणाम करतो.

इसाबेल १३ वर्षांची असताना अभिनेत्रीला आजार असल्याचं निदान झालं. अभिनेत्री लहानपणापासून या आजाराशी झुंजत होती. या आजारामुळे अभिनेत्रीचा मृत्यू झाला. २०२२ साली इसाबेलने सोशल मीडियावर आपल्या आजाराबाबत माहिती शेअर केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PF खातेदारांसाठी मोठी बातमी! EPFO 3.0 येणार; PF क्लेम सेटलमेंट होणार एका झटक्यात, पाहा अपडेट

Maharashtra News Live Update: गाडी सोडण्याच्या कारणावरून पोलिस आणि मराठा बांधव आमनेसामने; वडीगोद्री फाट्यावर शाब्दिक चकमक

Gold Rate Today : मोठी बातमी! सोन्याच्या दरात आजवरची सर्वात मोठी घसरण; 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

सकाळी उठल्यावर दात घासण्यापूर्वी पाणी पिण्याची सवय चांगली की वाईट? शरीरात होणारे ५ बदल जाणून घ्या

PM Kisan Yojana : शेतकऱ्यांच्या खात्यात 'या' दिवशी येणार २,००० रुपये! पीएम किसानचा हप्ता जमा झाला की नाही? असा तपासा स्टेटस!

SCROLL FOR NEXT