Hit And Run: हिमाचलमध्ये भीषण अपघात; 3 पोलिसांचा दुर्देवी मृत्यू Saam Tv
देश विदेश

Hit And Run: हिमाचलमध्ये भीषण अपघात; 3 पोलिसांचा दुर्देवी मृत्यू

हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात एक भयानक रस्ता अपघात झाला आहे.

वृत्तसंस्था

उना: हिमाचल प्रदेशातील Himachal Pradesh उना Una जिल्ह्यात एक भयानक रस्ता अपघात झाला आहे. या अपघातात तीन पोलिसांचा मृत्यू Una Three Police Death झाला आहे. ही घटना मध्यरात्रीची आहे. माहितीनुसार, एक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन पळ काढला. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीनुसार, उना येथील गॅग्रेटची ही घटना आहे . हा अपघात आशापुरी बॅरियरजवळ झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिघेही चौथ्या IRBN बटालियनचे सैनिक होते. ही घटना इतकी भयानक होती की, एका तरुणाचा पाय शरीरापासून विभक्त झाला होता. तीन तरुणांना धडक दिल्यानंतर वाहनाने त्यांना चिरडले होते.

उना पोलीस जवान संदीप कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो आशापुरी बॅरियरमध्ये ड्युटीवर होता. बुधवारी रात्री पावणेदहा ते दहाच्या सुमारास पोलिसांना कारच्या धडकेचा मोठा आवाज ऐकू आला. घटनास्थळी ते गेले असता दुचाकी अपघात झाला असलयाचे दिसून आले. जोरदार धडकेमुळे दुचाकीवरील तीन जण खाली पडले होते. पोलिसांनी पहिले की, तीन तरुणांपैकी दोन रस्त्यावर पडलेले होते. तर दुसरा एक कच्च्या रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला होता. त्याचवेळी दुचाकी दुसऱ्या बाजूला रस्त्यावर पडलेली होती.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: केस गळणे, कोरडेपणा आणि फ्रिझीनेसचा त्रास होतोय? हे तेल नियमीत लावा मिळेल सॉफ्ट सिल्की केस

रायगड जिल्ह्यात सात तालुक्यांमधील शाळांना उद्या सुट्टी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Paneer Chilli Recipe: हॉटेल स्टाईल टेस्टी पनीर चिली बनवा घरच्या घरी, वाचा सोपी रेसिपी

सावधान, मुंबईसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे ! अतिमुसळधार पावसाचा इशारा; महापालिकेकडून हेल्पलाईन नंबर जारी

जून कोरडाच, जुलैमध्येही पावसाचा तोटा? पेरण्या रखडल्या, बळीराजा संकटात

SCROLL FOR NEXT