Hindu outfits demands renaming of Qutub Minar to Vishnu Stambh, stages stir
Hindu outfits demands renaming of Qutub Minar to Vishnu Stambh, stages stir Twitter/@AHindinews
देश विदेश

कुतुबमिनारचं नाव बदलून विष्णूस्तंभ ठेवा; दिल्लीतील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली: राजधानी दिल्लीतील काही हिंदू संघटनांच्या सदस्यांनी मंगळवारी कुतुबमिनारच्या (Qutab Minar) ऐतिहासिक वास्तूजवळ हनुमान चालिसाचे (Hanuman Chalisa) पठण केले. यासोबतच कुतुबमिनारचे नाव बदलून विष्णूस्तंभ (VishnyStambh) करण्याची मागणी या हिंदू संघटनांकडून करण्यात आली आहे. (Hindu outfits demands renaming of Qutub Minar to Vishnu Stambh, stages stir)

हे देखील पाहा -

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळपासून कुतुबमिनारजवळ हिंदू संघटनांची निदर्शने सुरू आहेत. महाकाल मानव सेवा (Mahakal Manav Seva) या हिंदू संघटनेच्या सदस्यांनी कुतुबमिनारजवळ हनुमान चालिसाचे पठण करून निषेध केला. कुतुबमिनार हा प्रत्यक्षात विष्णूस्तंभ असल्याचा दावा हिंदू संघटनांनी यावेळी केला आहे. तसेच जैन आणि हिंदू मंदिरे पाडून ही इमारत (कुतुबमिनार) बांधण्यात आला असल्याचा दावाही या संघटानांनी केला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून काही लोकांना ताब्यात घेतले. कुतुबमिनार परिसराची सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी अधिक कडक केली. त्याच वेळी, दिल्ली पोलिसांनी संयुक्त हिंदू आघाडीचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि राष्ट्रवादी शिवसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष जय भगवान गोयल यांना कुतुबमिनारजवळ हनुमान चालीसा वाचण्यास परवानगी न देत त्यांना नजरकैदेत ठेवले आहे. त्याचप्रमाणे "भारत ही सनातन भूमी आहे, त्यामुळे कुतुबमिनार सोबतच सर्व मुघल इमारती आणि रस्त्यांचेही नामांतर करावे" अशी या आंदोलकांची मागणी आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashatra Elction: कोकणात ठाकरे विरुद्ध ठाकरे लढाई; उद्धव आणि राज ठाकरेंच्या सभांचा झंजावात

Petrol वर नाही CNG वर धावणार Bajaj ची नविन बाईक, Platina पेक्षा देणार जास्त मायलेज

Poco X6 5G नविन अवतारात लॉन्च झाला, मिळणार जबरदस्त फीचर्स

Farmers Protest: पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे रेल रोको आंदोलन, 3 दिवस 46 गाड्या रद्द; 100 मार्ग बदलले

Gadchiroli Crime: धक्कादायक! जादूटोणाच्या संशयातून गावकऱ्यांनी महिलेसह दोघांना जिवंत जाळलं

SCROLL FOR NEXT