HP Buildings Collapsed Video  Saam TV
देश विदेश

Himachal Pradesh Buildings Collapsed : अवघ्या काही सेकंदात पत्त्यांसारख्या कोसळल्या ७ इमारती, कुल्लूमधील थरारक व्हिडीओ आला समोर

Viral Video : अवघ्या 26 सेकंदात 7 बहुमजली इमारती एकामागून एक कोसळल्या.

साम टिव्ही ब्युरो

Himachal Pradesh News :

हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यातून थरकाप उडवणारा व्हिडीओ समोर आला आहे. कुल्लू येथील अनी बसस्थानकाजवळील सुमारे सात इमारती पत्त्यांप्रमाणे कोसळल्या आहेत. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगराळ भागात भुस्खलन सुरुच आहे.

अवघ्या 26 सेकंदात 7 बहुमजली इमारती एकामागून एक कोसळल्या. सततच्या पावसामुळे या इमारतींना भेगा पडल्या होत्या. यानंतर नागरिकांना तीन दिवस अगोदर बाहेर काढण्यात आले होते. गुरुवारी या 7 इमारती कोसळल्या. (Trending News)

कुल्लू जिल्ह्यातील अनी बसस्थानकाजवळ सकाळी 9.15 वाजता ही घटना घडली. अनीचे एसडीएम नरेश वर्मा यांनी सांगितले की, पाच दिवसांपूर्वी या इमारतीत भेगा पडल्या होत्या. नागरिकांना आधीच सुरक्षित बाहेर काढल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Latest Marathi News)

अनेक इमारती कोसळल्याने इतर इमारतींना धोका निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. लोकांना खबरदारी घेण्याचे आवाहनही केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT