Himachal Pradesh Accident Saam Tv
देश विदेश

Accident: धावत्या कारवर कोसळलं भलं मोठं झाड, ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू

Himachal Pradesh Accident: हिमाचल प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ४ महिला शिक्षकांचा मृत्यू झाला. या अपघातामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Priya More

Summary -

  • हिमाचल प्रदेशच्या कुल्लूमध्ये भीषण अपघात

  • भलं मोठं झाड धावत्या कारवर कोसळलं

  • या अपघातामध्ये ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला

  • अपघातामध्ये ३ जण जखमी झालेत

हिमाचल प्रदेशमध्ये भीषण रस्ते अपघातामध्ये ४ शिक्षिकांचा मृत्यू झाला. कुल्ली जिल्ह्यामध्ये शनिवारी सायंकाळी ही अपघाताची घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे कारवर भलं मोठं झाड कोसळलं. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला दरीत कोसळली. या अपघातामध्ये ३ जण गंभीर जखमी झाले. पोलिस अपघाताचा तपास करत आहेत.

शमशेर-गुगरा रस्त्यावर कारला अपघात झाला. झाड कोसळल्यामुळे कारचा चुराडा झाला. या कारमधून प्रवास करणाऱ्या ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला. या चौघी शाळा सुटल्यानंतर घराच्या दिशेने जात असताना ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी ५ वाजता शाळा सुटल्यानंतर शिक्षिका कारने घरी जात होत्या. वाटेत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू झाला. या वादळी वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले भलेमोठे झाड उन्मळून धावत्या कारवर कोसळले. चालकासह ७ जण या कारमधून प्रवास करत होते. या कारमध्ये बहुतांश शिक्षिका होत्या. झाडाच्या प्रचंड वजनामुळे आणि अति वेगामुळे कार रस्त्यावरून खाली दरीत कोसळली.

या अपघातामध्ये ४ शिक्षिकांचा मृत्यू झाला. तर ३ जण जखमी झाले. स्नेह लता, बंटी कौंडल, उषा कुमारी आणि सीमा आझाद या चौघींचा अपघातामध्ये मृत्यू झाला. त्या सर्वजणी नजीकच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी करत होत्या. त्यांच्या अचानक झालेल्या अपघाती निधनामुळे त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. तर या अपघातामध्ये कार चालक सुरेश चंद, तारा देवी, रीना कुमारी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Petrol Price: मुंबईत पेट्रोल ५ रुपये स्वस्त दराने मिळणार; मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी

ST NCMC Card: एसटी प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! महिला, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिकांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक

अंबाबाईला अडीच कोटींचा सोन्याचा कळस, दीड किलो सोन्याचा कळस अंबाबाईच्या चरणी

Zp Scam: जिल्हा परिषदेत बोगस बिलांचा घोटाळा, CEOच्या बंगल्याला 25 लाखांची लाईटिंग

तुकाराम मुंढेंचा ऑपरेशन गुटखा’ यशस्वी! 350 जणांना अटक, 274 दुकाने सील, राज्यभर खळबळ

SCROLL FOR NEXT