हिमाचल प्रदेशमध्ये ट्रेकिंगला गेलेले 17 ट्रेकर्सपैकी 11 जणांचा मृत्यू, दोघे वाचले Saam Tv
देश विदेश

हिमाचल प्रदेशमध्ये ट्रेकिंगला गेलेले 17 ट्रेकर्सपैकी 11 जणांचा मृत्यू, दोघे वाचले

हिमाचल प्रदेशमध्ये बेपत्ता झालेले पर्यटक, कुली आणि मार्गदर्शकासह १७ ट्रेकर्सच्या ग्रूपमधील ११ जणांचा मृत्यू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : हिमाचल प्रदेशमध्ये Himachal Pradesh बेपत्ता झालेले पर्यटक, कुली आणि मार्गदर्शकासह १७ ट्रेकर्सच्या trekkers ग्रूपमधील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. हे ट्रेकर्स बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यावर हवाई दलाने Air Force लमखागा खिंडीत मोठ्या प्रमाणावर बचाव कार्याला सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत ११ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

हा ग्रूप १८ ऑक्टोबर दिवशी प्रचंड हिमवर्षाव Snowfall आणि खराब हवामानामुळे Bad weather बेपत्ता झाले आहेत. ट्रेकर्स बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यावर भारतीय हवाई दलाने २० ऑक्टोबर दिवशी बचाव कार्याला सुरूवात केली होती, असे सांगण्यात येत आहे की, हे ट्रेकर्स १४ ऑक्टोबर दिवशी उत्तराखंड मधील उत्तर काशीला लागून असलेल्या हर्षिल येथून हिमाचल प्रदेश मधील किन्नौरमध्ये चित्कुलकरिता रवाना झाले होते. पण ते १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान लमखागा खिंडीजवळून बेपत्ता झाले होते.

हे देखील पहा-

बेपत्ता ट्रेकर्सचा शोध घेण्याकरिता राष्ट्रीय आपत्ती बचाव दलाचे NDRF ३ जवान तैनात करण्यात आले आहेत. आणि लाईट हेलिकॉप्टरने ALH उंच डोंगरावर बचाव कार्याला सुरूवात केली. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, २१ ऑक्टोबर दिवशी SDRF च्या सदस्यांनी ४ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. या दरम्यान, २२ ऑक्टोबर दिवशी ALH ने एका वाचलेल्या व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. १६५०० फूट उंचीवरुन ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. उर्वरित ४ जणांबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळाली नाही. अधिकाऱ्यांनी मृतदेह स्थानिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

वाचलेल्यांना हर्षिल या ठिकाणी प्राथमिक उपचारानंतर उत्तरकाशी येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पश्चिम बंगाल आणि इतर ठिकाणच्या ८ पर्यटकांची टीम ११ ऑक्टोबर दिवशी मोरी सांक्रीच्या ट्रेकिंग एजन्सीच्या माध्यमातून हर्षिलला रवाना झाली होती. १३ ते २१ ऑक्टोबर दरम्यान लामखागा जवळ ट्रेकिंगकरिता या टीमने वन विभाग, उत्तरकाशी यांच्याकडून इनर लाईन परमिटही घेतले होते.

१७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान खराब हवामानामुळे ही टीम भरकटली होती. ट्रेकिंग टीमशी कोणताही संपर्क न झाल्यामुळे सुमित हिमालयन ट्रेकिंग टूर एजन्सीने उत्तराखंड सरकार आणि हिमाचल प्रदेश सरकारला पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याकरिता कळवले. किन्नौर जिल्हा प्रशासनाला बुधवारी ही टीम बेपत्ता झाल्याची माहिती देण्यात आली होती.

दिल्लीच्या अनिता रावत (वय-३८), पश्चिम बंगालचे मिथुन दारी (वय-३१), तन्मय तिवारी (वय-३०) , विकास मकल (बी-३३) सौरभ घोष (वय-३४) सावियन दास (वय-२८), रिचर्ड मंडल (वय-३०) सुकन मांझी (वय-४३) अशी टीम सदस्यांची नावे आहेत. तर स्वयंपाक करणाऱ्या कर्मचाऱ्यांची ओळख देवेंद्र (वय-३७), ज्ञानचंद्र (वय-३३) आणि उपेंद्र (वय-३२) अशी आहे, जे उत्तरकाशी मधील पुरोलाचे सर्व रहिवासी आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना लवकरच २१०० रुपये हफ्ता मिळणार, मंत्र्याचं मोठं विधान

Children diabetes risk: गोड, जंक फूडमुळे लहान मुलांमध्ये वाढतोय मधुमेहाचा धोका; चुकीच्या आहाराच्या सवयी पालकांनी कशा बदलाव्या?

Special Hairstyle: पार्टी, फंशन किंवा लग्नासाठी साडीवर करा 'या' सोप्या आणि सुंदर हेअरस्टाईल

Viral Video : हॉटेल रूमसाठी ऑनलाइन बुकिंग करताना चुकीची लिंक क्लिक झाली; तरुणीसोबत असं काही घडलं की ढसाढसा रडली, पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : बुरखा घालून येणार्या महिला मतदारांना ओळखण्यासाठी 'पडदानशिन' महिला कर्मचार्याची नियुक्ती होणार

SCROLL FOR NEXT