दिल्लीत High Alert : आंतरराष्ट्रीय विमानतळाला उडवून देण्याची धमकी  Saam Tv news
देश विदेश

दिल्लीत High Alert : आंतरराष्ट्रीय विमानतळाला उडवून देण्याची धमकी

दहशतवादी संघटना अलकायदाने ही धमकी दिली आहे

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दिल्ली : राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (Indira Gandhi International Airport) उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल आल्यामुळे विमानतळ परिसरात खळबळ उडाली आहे. दहशतवादी संघटना अलकायदाने हा ई-मेल पाठवल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीच्या ई-मेल मिळताच ही धमकी मिळताच विमानळ परिसरासह दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. (High alert in Delhi: Threat to blow up international airport)

पाकिस्तानातून मोहम्मद जलाल आणि त्याची पत्नी शैली शारडा हे दुबईतून दिल्लीत येत आहेत. पुढच्या तीन-चार दिवसांत दिल्लीचं विमानतळ उडवून देण्यात येणार असल्याचा ई-मेल विमानतळाच्या पोलीस स्टेशनला मिळाला. गांभीर्य लक्षात घेत त्यांनी ही माहिती एअरलाईन ऑपरेशन कंट्रोल सेंटरला दिली. त्यानंतर तातडीनं हालचाली करत विमानतळाची सुरक्षा वाढविण्यात आली.

या ईमेलचं गांभिर्य लक्षात घेता इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सुरक्षेसंबंधीचे सर्व उपाय काटेकोरपणे पाळले जात आहेत. विमानतळावर येणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आणि साहित्याची कसून तपासणी करण्यात येत आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांना फटका

MPSC Exam 2025 Date : महत्वाची बातमी! MPSC परीक्षा पुढे ढकलली, आता या तारखेला होणार परीक्षा

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

SCROLL FOR NEXT