Ajit Pawar Vs Eknath Shinde Saam Tv
देश विदेश

Shinde VS Pawar: अजित पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात कोल्ड वॉर? नेमकं कारण काय?

Ajit Pawar Vs Eknath Shinde: ठाणे जिल्ह्यातच अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत ठाण्यात गुंड प्रवृत्ती वाढली असल्याची टीका केली. त्यामुळे अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> सुनील काळे, मुंबई

Ajit Pawar Vs Eknath Shinde:

मुख्यमंत्री यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्यातच अजित पवार यांनी शक्तिप्रदर्शन करत ठाण्यात गुंड प्रवृत्ती वाढली असल्याची टीका केली. त्यामुळे अजित पवार आणि मुख्यमंत्र्यांमध्ये सुप्त संघर्ष सुरू झाला आहे का? अशी चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे अजित पवार आणि शिंदे गटांमध्ये जागा वाटपावरुनही वाद होण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्हा हा मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला मानला जातो. या बालेकिल्ल्यात गुंड प्रवृत्ती वाढली, अशी टीका अजित पवारांनी केली. त्यामुळे शिंदे गटासह राजकीय वर्तुळात हालचाल निर्माण झाली आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव खासदार असलेल्या कल्याणमध्ये अजित पवार यांनी मेळावा घेतल्याने राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा सुरू झालीय. आधी निधी वाटपावरून दोन्ही गटात वादावादी असताना आता अजित पवार यांच्या टिप्णीवरून अजित पवार आणि मुख्यमंत्री यांच्यात सुप्त संघर्ष सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. (Latest Marathi News)

शिंदे गट आणि अजित पवार गटात निधी वाटपावरून आधी वाद होता. महाविकास आघाडी सरकार असताना अजित पवार अर्थमंत्री होते. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि भाजपची युती होऊन शिंदे मुख्यमंत्री झाले. पण आता अजित पवार आल्यानंतर त्यांच्याकडेच अर्थमंत्रीपद पुन्हा दिल्याने निधी वाटपाची चर्चा नेहमी होत होती.

त्यात मावळ आणि शिरूर या जागांवर अजित पवारांबरोबर शिंदे गटानेही दावा ठोकला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन्ही गटात जागावाटपवरूनही तिढा  लागण्याची शक्यता आहे. त्यात अजित पवार यांच्या भाषणानं तिढा वाढल्याची चर्चा आहे.

शिरूरमधून आढळराव पाटील यांचे नाव चर्चेत आहे. तर त्या जागेवर अजित पवार गटाने दावा केलाय दुसरीकडे मावळमधून पार्थ पवार यांच्या नावाची चर्चा आहे. मावळमध्ये सध्या विद्यमान खासदार शिंदे गटाचे श्रीरंग बारणे आहेत. त्यात कल्याण मतदारसंघात अजित पवार यांनी सभा घेऊन वातावरण निर्मितीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातले वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे विधानभवनात सत्ता, आमच्याकडे रस्त्यावर, राज ठाकरेंचा कडक इशारा

१२ वर्षाच्या विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू, शाळेच्या गेटजवळ कोसळला; घटना सीसीटीव्हीत कैद

Marathi Language: मायबोली मराठी भाषेचा उदय कधी झाला माहिती आहे का?

Marathi Bhasha Vijay Live Updates: केडियाचं ऑफिस उद्ध्वस्त; हा तर फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे – मनसैनिकांचा इशारा|VIDEO

Marathi Vijay Melava: हाच तो क्षण! उद्धव - राज ठाकरे २० वर्षांनी एकाच व्यासपीठावर; पाहा भावनिक क्षण

SCROLL FOR NEXT