Hemant Soren Resigns As Jharkhand Chief Minister ANI
देश विदेश

Hemant Soren Resign: मोठी बातमी! हेमंत सोरेन यांनी दिला राजीनामा, चंपाई सोरेन झारखंडचे नवीन मुख्यमंत्री

Jharkhand New CM: एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Satish Kengar

Hemant Soren Resigns As Jharkhand Chief Minister:

एक मोठी राजकीय बातमी समोर आली आहे. हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री चंपाई सोरेन हे राज्याचे पुढील मुख्यमंत्री असतील.

कथित जमीन घोटाळ्यासंदर्भात चौकशी करण्यासाठी ईडीचे पथक बुधवारी दुपारी दीड वाजता हेमंत सोरेन यांच्या निवासस्थानी पोहोचले होते. ईडीने हेमंत सोरेन यांची सुमारे 8 तास चौकशी केली. चौकशीनंतर हेमंत सोरेन यांनी राजभवन येथे पोहोचले आणि झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ईडी चौकशीनंतर हेमंत सोरेन विजयाचे चिन्ह दाखवत राजभवनात पोहोचले. त्यांच्यासोबत अनेक आमदारही होते. मात्र राजभवनाबाहेर आमदारांची वाहने अडवण्यात आली. हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्याची पुष्टी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी केली. (Latest Marathi News)

ईडी चौकशीनंतर हेमंत सोरेन विजयाचे चिन्ह दाखवत राजभवनात पोहोचले. त्यांच्यासोबत अनेक आमदारही होते. मात्र राजभवनाबाहेर आमदारांची वाहने अडवण्यात आली. हेमंत सोरेन यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केल्याची माहिती काँग्रेसचे अध्यक्ष राजेश ठाकूर यांनी केली.

चंपाई सोरेन असणार नवीन मुख्यमंत्री

बुधवारी हेमंत सोरेन यांची विधिमंडळ पक्षासोबत महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत हेमंत यांनी आपल्या आमदारांना दोन पेपर्सवर सह्या करून घेतल्या, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सूत्रांनी म्हटलं आहे की, या दोन्ही पेपर्समध्ये कल्पना सोरेन आणि चंपाई सोरेन यांच्या नावांना आमदारांनी पाठिंबा दिला होता. हेमंत सोरेन त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना विधिमंडळ पक्षाच्या नेत्या बनवतील, असे बोलले जात होते, मात्र पक्षाच्या ज्येष्ठ नेते चंपाई सोरेन यांचे नाव निश्चित झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Car Accident: प्रसिद्ध अभिनेत्याच्या कारचा भीषण अपघात; चित्रपटाच्या प्रमोशनवरून परतत येताना घडली घटना

35000 ची मागणी, 30 हजारांत मांडवली; भंगारवाल्याकडून पोलिस चौकीतच लाच घेताना हवालदारांला रंगेहाथ पकडलं

Maharashtra News Live Update: आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांची मालेगाव सामान्य रुग्णालयाला अचानक भेट

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या आंदोलनाला यश, पेलेट गनप्रकरणी अखेर गुन्हा, FIR मध्ये कुणाची नावं?

Vangyachi Chatni Recipe : गरमागरम भाकरी अन् वांग्याची झणझणीत चटणी, चव इतकी भन्नाट की विचारू नका!

SCROLL FOR NEXT