Heavy Rainfall In Brazil:  Saamtv
देश विदेश

Brazil Flood: ब्राझीलमध्ये पावसाचा हाहाकार... ५७ हून अधिक मृत्यू; हजारो नागरिक बेपत्ता

Heavy Rainfall In Brazil: पुरामुळे हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत. तर हजारो लोक बेपत्ता आहेत. सध्या पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे.

Gangappa Pujari

ब्राझीलमध्ये मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनामुळे हाहाकार माजवला आहे. या आठवड्यात झालेल्या पावसामुळे ५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पुरामुळे हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत. तर हजारो लोक बेपत्ता आहेत. सध्या पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून बचाव कार्य सुरू आहे.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, महापूर आणि भूस्खलनामुळे ब्राझीलमध्ये हाहाकार माजवला आहे. दक्षिणेकडील रिओ ग्रांदे डो सुल या राज्यात त्याचा सर्वाधिक प्रभाव पाहायला मिळत आहे. मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेले आहेत. पुरामुळे हजारो लोकांना घरे सोडावी लागली आहेत. रिओ ग्रांदे दो सुलमध्ये पाण्याची पातळी जास्त असल्याने धरणांवर त्याचा भर वाढतो त्यामुळे महापूराची स्थिती निर्माण झाली. महापूरामध्ये रस्त्यांवर पाणी साचले आहे.

पावसामुळे ५७ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर हजारो लोक बेपत्ता आहेत. 67,000 हून अधिक लोक प्रभावित झालेल्या भागात स्थानिक सरकारने आपत्तीची स्थिती घोषित केली आहे आणि 4,500 हून अधिक लोक तात्पुरत्या आश्रयस्थानांमध्ये आहेत. बचाव पथके लोक आणि पाळीव प्राण्यांना शोध घेत आहेत.

दरम्यान, या संपूर्ण परिस्थितीवर गव्हर्नर एडुआर्डो लीट यांनी परिसरात आणीबाणीची घोषणा जाहीर केली. आम्ही आमच्या इतिहासात पाहिलेल्या सर्वात वाईट शोकांतिकेचा सामना करत आहोत, असे त्यांनी म्हटले आहे. तसेच धोका असलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबई विमानतळ सीमाशुल्क मोठी कारवाई

निवडणुकीत पैसे वाटण्यासाठी रवींद्र चव्हाणांच्या मार्फत भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात 25 लाख रुपये, आमदार राणेंचा खळबळजनक आरोप|VIDEO

Hong Kong Fire: हाँगकाँगमध्ये २००० फ्लॅट असलेल्या सोसायटीला भीषण आग! घटनास्थळी ७०० अग्निशमन दल दाखल, १३ जणांचा मृत्यू

Bhakari Tips: कोणत्या व्यक्तींनी बाजरी आणि नाचणीची भाकरी खाणं टाळावे?

भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात बॅग भरून पैसे, स्वतः निलेश राणेंनी केलं स्टिंग ऑपरेशन राणेंची धाड|VIDEO

SCROLL FOR NEXT