Haryana Assembly Election 2024 Saam Tv
देश विदेश

Haryana Election 2024: मोठी बातमी! हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख बदलली, आता 'या' तारखेला होणार मतदान

Haryana Assembly Election 2024: हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे. आधी येथे १ ऑक्टोबरला मतदान होणार होते. मात्र आता ही तारीख रद्द करण्यात आली आहे.

Satish Kengar

एक मोठी बातमी समोर आली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीची तारीख बदलण्यात आली आहे. आधी येथे १ ऑक्टोबरला मतदान होणार होते. मात्र आता ही तारीख रद्द करण्यात आली आहे. आता येथे ५ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे.

यासोबतच जम्मू-काश्मीर आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी मतमोजणी तारीख आता ४ ऑक्टोबर ऐवजी ८ ऑक्टोबर करण्यात आली आहे. या दोन्ही राज्यांचे निवडणूक निकाल ८ ऑक्टोबरला जाहीर होतील.

का घेण्यात आला हा निर्णय?

निवडणूक आयोगाने म्हटले आहे की, 'बिष्णोई समाजाच्या मतदानाचा हक्क आणि परंपरा यांचा आदर करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यांनी आपल्या गुरू जंभेश्वरांच्या स्मरणार्थ आसोज अमावस्या उत्सवात सहभागी होण्याची जुनी परंपरा कायम ठेवली आहे.''

दरम्यान, याआधी निवडणूक आयोगाने जाहीर केले होते की, ९० सदस्यांच्या हरियाणा विधानसभेसाठी १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. तसेच ४ ऑक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार होते. सध्या राजकीय पक्षांमध्ये आपापले उमेदवार जाहीर करण्यासाठी विचारमंथन सुरू आहे.

मुख्यमंत्री नायब सिंग सैनी कुरुक्षेत्रातील लाडवा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त आहे. भाजपच्या हरियाणा राज्याचे अध्यक्ष मोहनलाल बडोली यांनी ही माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhiraj Deshmukh: माजी मुख्यमंत्र्यांच्या धाकट्या मुलाचं शिक्षण किती?

Badlapur : बदलापुरातील भोज धरणातील बंधाऱ्यावर तरुणाचा जीवाशी खेळ | VIDEO

Nagpur Crime: नागरपूरच्या लक्झरी हॉटेलमध्ये देहविक्रीचा नंगानाच, परदेशी तरूणीकडून 'नको ते कृत्य' पोलिसांची रेड अन्..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी का सोडतात?

Skip Lunch Effect: जेवण टाळणं म्हणजे आजारांना निमंत्रण? जाणून घ्या शरीरावर होणारे दुष्परिणाम

SCROLL FOR NEXT