ips  Saam Tv News
देश विदेश

Shocking : अतिरिक्त पोलीस महासंचालकांची आत्महत्या, IAS पत्नी मुख्यमंत्र्यांसोबत जपान दौऱ्यावर, पोलीस दलात खळबळ

haryana shocking : अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी आत्महत्या केलीये. त्यांनी आत्महत्या केल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

Vishal Gangurde

ADGP वाय एस पूरन यांनी चंदीगडमध्ये स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली.

आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही

त्यांच्या पत्नी सध्या जपान दौऱ्यावर

घटनेमुळे संपूर्ण पोलीस दलात शोककळा

हरियाणाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय एस पूरन यांनी चंढीगढमध्ये स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. त्यांची पत्नी आयएएस अधिकारी असून त्या मुख्यमंत्री मनोहर लाल सैनी यांच्यासोबत जपान दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरु केला आहे. अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या आत्महत्येने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालक वाय एस पूरन यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पूरन यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पूरन यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या प्रकरणाची पुढील तपास देखील सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतिरिक्त पोलीस महासंचालक पूरन यांची पत्नी आयएएस अधिकारी आहेत. त्या सध्या जपान दौऱ्यावर आहेत. प्रशासनाने त्वरित घटनास्थळी पोहोचून कारवाईला सुरुवात केली आहे. पोलिसांनी संपूर्ण क्षेत्राला घेरा घालून तपास सुरु केला आहे. घटनास्थळी कोणत्याही प्रकारची चिठ्ठी मिळाली नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी आता घटनास्थळी आणि घराच्या आसपास असलेले सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे.

अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या आत्महत्येने पोलीस दल आणि प्रशासनात शोककळा पसरली आहे. त्यांच्या टोकाच्या निर्णयाने सर्वच विभागात खळबळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आयपीएस वाई पूरन कुमार हरियाणाच्या २००१ सालच्या बॅचचे भारतीय पोलीस सेवेचे अधिकारी होते.

पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं की, अतिरिक्त पोलीस महासंचालकांच्या आत्महत्येचं कारण शोधण्याचा तपास सुरु आहे. या प्रकरणाचा बारकाईने तपास केला जाईल. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असं आवाहन पोलीस आणि प्रशासनाने केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

डान्सरचा धांगडधिंगा, कारवाईचा बडगा; निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह 8 डान्सर्सवर गुन्हा

Fact Check: मंदिर पाडलं, हनुमान हलेना? 1000 वर्षांपूर्वीची प्राचीन मूर्ती असल्याचा दावा?

SCROLL FOR NEXT