Hariyana Accident News saam tv
देश विदेश

Hariyana Bus Accident: हरियाणात भीषण अपघात; बस आणि कार एकमेकांना धडकल्या, ७ जणांचा मृत्यू

Hariyana Bus Accident: हरियाणाच्या भिवानी रोड येथील बीबीपूर गावाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झल्याची माहिती समोर आली आहे.

Vishal Gangurde

Hariyana Bus Accident News: महाराष्ट्रासहित देशभरात अपघातांच्या मालिका सुरूच आहे. हरियाणातही भीषण अपघात झाला आहे. हरियाणाच्या जींद जिल्ह्यात बस आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. हरियाणाच्या भिवानी रोड येथील बीबीपूर गावाजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

हरियणात भीषण अपघात झाला आहे. हरियाणात रस्त्यावर बस आणि कारचा अपघात झाला. तर या बसच्या अपघातात कंडक्टर देखील जखमी झाला आहे. त्यांना डोक्याला जखम झाली आहे. त्यांनी सांगितलं की, एक कार ही ओव्हरटेक करत होती, त्याचदरम्यान बस आणि कार एकमेकांना धडकल्या. या बसमध्ये १५ ते २० प्रवासी होते. तर कारमध्ये १० प्रवासी होते.

दरम्यान, या भीषण अपघातानंतर सहा रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या. भिवानी रोडवेजवर अपघात घडला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. कारमधील प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

तेलंगणात अशीच एक भयंकर घटना समोर आली आहे. तेलंगणातील हैदराबाद येथे दोन दिवसांपूर्वी धावत्या बसला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडलीये.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, हैदराबादमध्ये TSRTC बसला अचानक आग लागली. यावेळी बसमध्ये सुमारे ११ जण प्रवास करत होते. धूर येऊ लागल्याने प्रवाशी लगेच बसमधून खाली उतरले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते . त्यानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Upvasachi Kachori: आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची कचोरी, घरीच फक्त १० बनवा

Sushil Kedia : ठाकरेंची माफी मागितल्यावर केडियाची आणखी एक पोस्ट, थेट अमित शहा यांचेच नाव घेतलं

Varai Khichdi Upvas : उपवासाला साबुदाणे कशाला? झटपट करा वरईची खिचडी, नोट करा सोपी रेसिपी

Maharashtra Live News Update: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अजित पवारांची निवड

Thackeray Brothers Reunion: ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने विरोधकांची पायाखालची वाळू सरकली – शिवसैनिकांची प्रतिक्रिया|VIDEO

SCROLL FOR NEXT