Harish Rawat Congress  Saam TV
देश विदेश

Congress : काँग्रेसला मोठा धक्का बसणार? माजी मुख्यमंत्री पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत, समोर आली मोठी अपडेट

Harish Rawat Congress controversy : उत्तराखंड काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदांमुळे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. परवानगीशिवाय जनसंवाद आणि आभार यात्रा काढल्याने काँग्रेस हायकमांड नाराज असल्याचे वृत्त आहे.

Namdeo Kumbhar

Harish Rawat Congress exit rumours latest news : उत्तराखंड काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि पक्षांतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत. विनापरवानगी सुरू केलेल्या 'जनसंवाद' आणि 'धन्यवाद' यात्रेबाबत स्पष्टीकरण देण्यासाठी दिल्लीला गेलेले माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते हरीश रावत गेल्या दोन दिवसांपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. पण काँग्रेस हायकमांडकडून त्यांना अद्याप भेटीची वेळ मिळालेली नाही. एकेकाळी अवघ्या एका फोनवर गांधी घराण्याची भेट मिळणाऱ्या रावत यांच्यावर ही वेळ आल्यामुळे ते काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याच्या राजकीय चर्चांनी जोर धरला आहे.

दरम्यान, पक्षांतराच्या या सर्व चर्चांवर हरीश रावत यांनी मौन सोडले आहे. "मी काँग्रेस किंवा गांधी-नेहरू घराण्याला कधीही सोडू शकत नाही, माझ्या मृत्यूनंतर माझा देह काँग्रेसच्याच झेंड्यात वेढला जावा," असे सांगत त्यांनी पक्ष सोडण्याच्या अफवा फेटाळून लावल्या आहेत. तरीही हायकमांडने घेतलेल्या कडक भूमिकेमुळे आणि भेटीसाठी ताटकळत ठेवल्यामुळे उत्तराखंडच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

काँग्रेसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरू आहेत, त्यामध्ये वरिष्ठ नेते व्यस्त आहेत, त्यामुळे हरिश रावत यांना भेटीसाठी वेळ देता आला नाही. ते शुक्रवारी राज्याच्या प्रभारी सेलजा यांची भेट घेतील अशी माहिती समोर आली. हरिश रावत यांनी यापूर्वी सोशल मीडियावर आपली खंत व्यक्त केली होती. ६० वर्षांपासून काँग्रेससोबत आहेत. पण त्यांना कधीही जबाबदार धरले गेले नाही. रावत यांच्या काँग्रेस सोडण्याच्या चर्चेनेही जोर धरला आहे. पण रावत यांनी या अफवा असल्याचे सांगितलेय.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरीश रावत बुधवारी रात्री उशिरा दिल्लीत दाखल झाले. त्यांनी पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि राज्याच्या प्रभारी कुमारी सेलजा यांची भेट घेण्यासाठी वेळ मागितली आहे. हरीश रावत यांनी उत्तराखंडमध्ये स्वतंत्रपणे सुरू केलेल्या 'जनसंवाद आणि आभार यात्रे'वर काँग्रेस हायकमांडने तीव्र आक्षेप घेतला आहे. प्रदेश काँग्रेसच्या परवानगीशिवाय काढण्यात आलेली ही यात्रा म्हणजे पक्षाच्या मुख्य उपक्रमांना समांतर चालवलेले 'शक्तीप्रदर्शन' असल्याचे हायकमांडचे मत आहे. उत्तराखंडमधील स्थानिक नेत्यांच्या तक्रारीनंतर, प्रदेश प्रभारी कुमारी सेलजा यांनी रावत यांच्याकडे या दौऱ्याबाबत स्पष्टीकरण मागितले होते. त्यापाठोपाठ सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनीही यावर कडक भूमिका घेत, रावत यांना दिल्लीत येऊन पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापुढे आपली बाजू मांडण्याचे निर्देश दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीडच्या शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी मदतीची आशा! ९० टक्के पंचनामे पूर्ण, उद्या अहवाल शासनाकडे

Heart Attack: हार्ट अटॅक सर्वात कॉमन लक्षणं कोणती? रुग्णालयात जाण्यापूर्वी करा 'ही' कामं; डॉक्टरांनी दिला महत्त्वाचा सल्ला

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! एकाच वेळी २ महागाई भत्ते मंजूर; 'या' दिवशी बँक खात्यात जमा होणार वाढीव पगार

CJP च्या आंदोलनापूर्वीच पोलिसांची धरपकड; पदाधिकाऱ्यांना पहाटे घेतले ताब्यात

Mumbai : IIT बॉम्बेमध्ये मोठी दुर्घटना! हॉस्टेलमध्ये अचानक भीषण आग, ५ विद्यार्थी होरपळले

SCROLL FOR NEXT