Independence Day Special Quotes and Messages Saam Tv
देश विदेश

स्वातंत्र्य दिनासाठी शुभेच्छा संदेश | Happy Independence Day 2023 Wishes In Marathi

Happy Independence Day 2023: तुम्हीसुद्धा यावर्षी तुमच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना मराठीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाठवू शकता....

Priya More

Independence Day Special Wishes, Quotes and Messages in Marathi :

येत्या मंगळवारी संपूर्ण देश 'स्वातंत्र्य दिन' साजरा करणार आहे. 1947 पासून दरवर्षी भारतात 15 ऑगस्ट हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यांची ७६ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रत्येक भारतीय अभिमानाने स्वातंत्र्य दिन साजरा करतो. स्वातंत्र्य दिनाच्या खास प्रसंगी प्रत्येक जण आपल्या मित्र परिवार, नातेवाईक आणि कुटुंबीयांना शुभेच्छा संदेश (Independence Day Wishes) पाठवतात. यावर्षी तुम्हीसुद्धा तुमच्या मित्र परिवार आणि नातेवाईकांना मराठीमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा पाठवू शकता....

१. स्वातंत्र्यवीरांना करूया शत शत प्रणाम,

त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

२. देश आपला सोडो न कोणी..

नातं आपलं तोडो न कोणी...

हृदय आपलं एक आहे,

देश आपली जान आहे...

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

३. निशान फडकत राही

निशाण झळकत राही

देशभक्तीचे गीत आमुचे

दुनियेत नि‍नादत राही

स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

४. देशाचे स्वातंत्र्य मानाने मिरवू,

प्रत्येक घरावर तिरंगा फडकवू,

भारतमातेचे गीत गाऊ,

तिरंगा लावू घरोघरी,

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

५. ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा,

त्यांच्या चरणी ठेवू माथा..

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

६. भारत देश विविध रंगांचा,

विविध ढंगांचा विविधता जपणा-या एकात्मतेचा…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

७.उत्सव तीन रंगांचा,

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी,

ज्यांनी भारत देश घडविला…

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

८. जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो,

जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो,

मरण आलं तरी दुःख नाही,

फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

९. धर्म तिरंगा कर्म तिरंगा,

चराचरात तिरंगा,

घराघरात तिरंगा सत्य तिरंगा,

नित्य तिरंगा हर घर तिरंगा,

हर मन तिरंगा,

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१०. आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला,

ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला,

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

११. नको कुठलाही धर्म,नको कुठलीही जात,

नको उगाच जातीपातीच्या लढाया,

धरू फक्त माणुसकीची कास,

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

१२. उत्सव तीन रंगाचा

आभाळी आज सजला,

नतमस्तक मी त्या सर्वांसाठी

ज्यांनी भारत देश घडवीला !

ज्यांनी लिहिली आझादीची गाथा,

त्यांच्या चरणी ठेविते माथा

स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा!

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

Maharashtra Live News Update: नांदूर-मध्यमेश्वर धरणातून गोदावरी पत्रात पाण्याचा विसर्ग वाढवला

Shocking News : संतापजनक! राजकीय वाद टोकाला, महिला मध्यरात्री उठली अन्...

Mithila Palkar: मिथिला पालकरचं वय वाढतय अन् सौंदर्यही खुलतय...

Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील सातही आरोपींची नावं समोर; कोकेन-गांजा, १० मोबईल अन् २ कार जप्त

SCROLL FOR NEXT