Happy Birthday PM Modi Saam Tv
देश विदेश

Happy Birthday PM Modi: PM मोदींनी मागील ५ वर्षे कसा साजरा केला वाढदिवस?

PM Modi Birthday :भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबरला आपला ७३ वाढदिवस साजरा करणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

PM Modi 73rd Birthday

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबरला आपला ७३ वाढदिवस साजरा करणार आहेत. २०१४ मध्ये मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाले. गेल्या ९ वर्षांपासून नरेंद्र मोदी देशाचा कारभार सांभाळत आहेत. दरवर्षी त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो. मागील पाच वर्षांत नरेंद्र मोदी यांनी आपला वाढदिवस कशा प्रकारे साजरा केला, याबाबत जाणून घ्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. भाजपचे कार्यकर्ते मोदींचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करतात. अनेक सामाजिक उपक्रम, शिबिरे आयोजित केली जातात.

इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, गुजरात भाजपकडून नरेंद्र मोदींचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. वाढदिवसानिमित्त जणू उत्सवच असणार आहे. १७ सप्टेंबर ते गांधी जयंतीपर्यंत हा उत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जाणार आहेत. गुजरातचे भाजपचे अध्यक्ष सीआर पाटील यांनी यासंदर्भात माहिती दिली. 'जिल्ह्यातील ३०,००० शालेय मुलींसाठी बँक खाती भाजपकडून उघडून दिली जाणार आहेत. तर भाजप युवा मोर्चाच्या वतीने गुजरातमधील सर्व जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे आयोजित करणार आहेत', असे पाटील यांनी सांगितले.

PM मोदींच्या वाढदिवशी अनोखे सेलिब्रेशन

२०१८ मध्ये नरेंद्र मोदी यांनी त्यांचा ६८ वा वाढदिवस साजरा केला. त्यावेळी ते वाराणसी येथे गेले होते. काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थना केली. त्यानंतर त्यांनी काशी विद्यापीठ ब्लॉकमधील रोहनिया येथील नारौर प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०१९ मध्ये वाढदिवशी सर्वप्रथम आईचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर गुजरातमधील केवडिया येथे 'नमामि नर्मदा' उत्सवाला हजेरी लावली. त्यानंतर त्यांनी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'च्या बाजूला झालेल्या जाहीर सभेत उपस्थितांना संबोधित केले होते.

२०२० मध्ये कोविड महामहामारीचे संकट होते. त्यामुळे नरेंद्र मोदी कोणालाही भेटले नव्हते. परंतु त्यांच्या पक्षाने सेवा सप्ताह आयोजित केला होता. यात त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. पक्षातील कार्यकर्त्यांनी गरजू लोकांना रेशनचे वाटप आणि रक्तदान शिबिरे आयोजित केली होती. तर भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मोदी सरकारच्या कामगिरीवरील 'लॉर्ड ऑफ रेकॉर्ड्स' या पुस्तकाचे प्रकाशन केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २०२१ मध्ये अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. भारताने यावेळी विशेष मोहीम राबवून २.२६ कोटी कोविड लसीकरण केले.

२०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आगळ्यावेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला होता. त्यांनी कुनो नॅशनल पार्कला भेट दिली होती. त्याचदिवशी या पार्कमध्ये खास नामिबियावरून आणलेले ८ चित्ते सोडले होते. खुद्द मोदींनी पार्कमध्ये फोटोशूट केले होते. हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nikki Tamboli: बाईsss... निक्कीचे मेकअप साहित्य येतं लंडनहून, कोणत्या प्रॉडक्टची किंमत किती?

Ladki Bahin Yojana: ईकेवायसी करताना झालेली चूक दुरुस्त करायचीये? लाडक्या बहिणींनो ही स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करा

Rajya Sabha election : शरद पवारांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध? हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

Accident : ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी १८ दिवसापूर्वी पुण्यातून निघाले, पण गुजरातमध्ये काळाने घात केला; ३ जिवलग मित्रांचा अपघाती मृत्यू

SCROLL FOR NEXT