10 वर्षानंतर हैती हदरलं, 7.2 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 304 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी Saam Tv
देश विदेश

10 वर्षानंतर हैती हदरलं, 7.2 तीव्रतेच्या भूकंपात आतापर्यंत 304 जणांचा मृत्यू तर शेकडो जखमी

हैती शहर भूकंपाच्या मोठ्या धक्क्याने हादरले आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था : हैती Haiti शहर भूकंपाच्या Earthquake मोठ्या धक्क्याने हादरले आहे. शनिवारी हैतीमध्ये 7.2 तीव्रतेचा भूकंप झाल्याचा जवळ आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या भूकंपामध्ये तब्बल ३०४ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १८०० हून अधिक जास्त लोकं जखमी झाले आहेत.

हे देखील पहा-

पंतप्रधान Prime Minister एरियल हेनरी Ariel Henry यांनी सांगितले की, या भूकंपाने मोठ्या प्रमाणात नासधूस झाले आहे. एक महिन्याकरिता याठिकाणी आणीबाणी जाहीर करण्यात आले आहे. हैती शहराच्या समुद्राच्या किनाऱ्यालगत असलेल्या भागात भूकंपाचा जोरात हादरा बसलेला आहे. ७.२ इतक्या रिश्टर स्केलवर या भूकंपाची नोंद झालेली आहे. या भूकंपाचे केंद्रबिंदू Focal point हे उत्तर पूर्वमध्ये १२ किलोमीटर लांब संत लुइस दु सुडमध्ये आहे.

या बेटावर व्हाइट हाउसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, अमेरिकेकडून America भूकंपग्रस्त भागात तातडीने मदत पूरवली जाणार आहे. हैतीमध्ये या अगोदर देखील भीषण भूकंप झाला होता. २०१८ मध्ये ५.९ तीव्रतेचा भूकंप झालेला होता. ज्यामध्ये १२ हून अधिक लोकांचा मृत्यू झालेला होता. तर २०१० मध्ये ७.१ तीव्रतेच्या भूकंप दुर्घटनेमध्ये जवळपास ३ लाख लोकांचा मृत्यू झाला होता. तेव्हा देशाच्या राजधानी मध्ये मोथे नुकसान झाले होते.

Edited By- digambar jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan : २ लाख शेतकऱ्यांना मोठा झटका, पीएम किसान योजनेचे पैसे बंद, तुमचे नाव तर नाही ना?

Maharashtra News Live Update: मुंबईत पाऊस, मुंबईकरांना दिलासा

Pune Nashik Railway: पुणे-नाशिक रेल्वे मार्गात महत्वाचा बदल; ताशी १६० किमी वेगाने होणार प्रवास, कसा असेल संपूर्ण लोहमार्ग?

यंदा 'फादर्स डे' कधी आहे? वडिलांना खूश करणाऱ्या 3 बेस्ट आयडिया

Diabetes: औषधांशिवाय रक्तातील साखर कमी करायचीये? दररोज 15 मिनिटं करा हे रुटीन फॉलो, लगेचच मिळेल आराम

SCROLL FOR NEXT