H. D. Kumaraswamy  Saam Digital
देश विदेश

H. D. Kumaraswamy : भर पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री कुमारस्वामींच्या नाकातून रक्तस्राव, तात्काळ रुग्णालयात केलं दाखल, पाहा VIDEO

Union Minister H. D. Kumaraswamy : बेंगळुरूमध्ये रविवारी भाजप-जेडीएस नेत्यांच्या बैठक झाली. बैठकीनंतर पत्रकार सुरू असताना केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी याच्या नाकातून रक्तश्राव सुरू झाला. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Sandeep Gawade

बेंगळुरूमध्ये रविवारी भाजप-जेडीएस नेत्यांच्या बैठकीनंतर पत्रकार सुरू असताना केंद्रीय मंत्री एचडी कुमारस्वामी याच्या नाकातून रक्तश्राव सुरू झाल्याने एकच खळबळ माजली होती. यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुमारस्वामी पत्रकार परिषदेत बोलत असताना ही घटना घडली आहे. त्यांचा शर्ट रक्ताने माखलेला होता.

अचानक रक्तस्राव सुरू झाल्यामुळे त्यांनी येडियुराप्पा यांना पत्रकार परिषदेत बोलण्यासाठी सांगितलं आणि ते नाकाला कापड लावून तेथून बाहेर पडले. यावेळी त्यांचा शर्टही रक्ताने माखला होता. मात्र, अचानक त्यांना नाकातून इतका रक्तस्राव का झाला, याचं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून उपचारही सुरू करण्यात आले आहेत.

पत्रकार परिषदेपूर्वी प्रदेश भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र, कुमारस्वामी आणि कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आर अशोक यांच्या उपस्थितीत भाजप-जेडीएस नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत म्हैसूर अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी (मुडा) घोटाळ्यासह भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर चर्चा करण्यात आली.

कर्नाटकातील काँग्रेस सरकारने आदिवासी समाजाची लूट केली असल्याचा आरोप विजयेंद्र यांनी बैठकीनंतर केला. दोन्ही पक्षांनी ३ ऑगस्टपासून पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. बीएस येडियुरप्पा आणि एचडी कुमारस्वामी या यात्रेत सहभागी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यात्रा 3 ऑगस्टला सुरू होऊन 10 ऑगस्टला सांगता होणार आहे. 10 ऑगस्टला सागंता सभेत भाजपचे राष्ट्रीय नेतेही उपस्थित राहणार आहेत. सरकारने आमची यात्रा रोखण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही थांबणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्याच्या भेटी होईना; अडचणी कोणी विचारेना, कार्यकर्त्यांना भासतेय अजितदादांची कमी

धुळे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात! ट्रॅव्हल्स बस पलटी, 6 प्रवासी जखमी

कार चालवताना अचानक उघडली 'एअर बॅग', एअर बॅगमुळे 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू

स्मार्ट मीटरचा झटका, ग्राहकांना लाखाचा फटका, सोलरधारकांना 20 पटीनं वीजबिल, महावितरणचं स्मार्ट मीटर की स्मार्ट लूट?

NEET नंतर TET चा पेपरही फुटला, 28 जूनची TET परिक्षा रद्द, भिवंडीतील पेपरफुटीचं हरियाणा-बिहार कनेक्शन

SCROLL FOR NEXT