Gyanvapi Case  Saam Tv
देश विदेश

Gyanvapi Case: 'ज्ञानवापी'च्या तळघरात पूजा सुरुच राहणार; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा मुस्लीम पक्षाला मोठा झटका

Rohini Gudaghe

Varanasi Gyanvapi Case

ज्ञानवापी प्रकरणात (Gyanvapi Case) मुस्लीम पक्षाला अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून मोठा झटका बसला आहे. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा करण्याचा हिंदू पक्षाचा अधिकार न्यायालयाने कायम ठेवला आहे. ज्ञानवापीच्या तळघरात पूजा पुन्हा सुरू करण्याचा आदेश वाराणसी जिल्हा न्यायालयाने दिला होता, त्याविरोधात मुस्लीम पक्षाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. (Latest Marathi News)

आज या प्रकरणी सुनावणी पार पडली आहे. ज्ञानवापी प्रकरणी अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad HC) निकाल दिला आहे. उच्च न्यायालयाने मुस्लीम पक्षाची याचिका फेटाळताना तळघरात पूजा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे मुस्लीम पक्षाला मोठा धक्का बसला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्ञानवापीच्या तळघरात पूजा

पूर्वी वाराणसी जिल्हा न्यायालयानेही या प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निकाल दिला होता. त्याविरोधात मुस्लीम पक्षाने अलाहाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, येथेही त्यांची निराशा (Varanasi Gyanvapi Case Allahabad Court) झाली. अलाहाबाद उच्च न्यायालयाने ज्ञानवापीच्या तळघरात हिंदूंना पूजा करण्याचा अधिकार राखून ठेवला. मात्र, सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय मुस्लीम पक्षासाठी अजूनही खुला आहे. मुस्लीम पक्ष सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

हिंदू-मुस्लीम दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून उच्च न्यायालयानं निर्णय आधीच राखून ठेवला होता. वाराणसी न्यायालयाच्या आदेशाला अंजुमन व्यवस्था समितीने आव्हान (Muslim Side Plea) दिले होते. यामध्ये पूजेला स्थगिती देण्याची मागणी केली होती.

मुस्लीम पक्षाची न्यायालयाकडे मागणी

मुस्लीम पक्षाने दावा केला होता की, डीएमला वाराणसी कोर्टाने तळघरावर देखरेख ठेवण्याचे अधिकार दिले आहेत. ते आधीपासूनच काशी विश्वनाथ मंदिराचे सदस्य आहेत. त्यामुळे त्यांची नियुक्ती होऊ शकत (Gyanvapi Case Worship Continues) नाही. मुस्लीम पक्षाने म्हटलं होतं की, कागदपत्रात कोणत्याही तळघराचा उल्लेख नाही. व्यासजींनी पुजेचे अधिकार आधीच ट्रस्टकडे हस्तांतरित केल्याचंही मुस्लीम पक्षाने म्हटलं होतं. त्यांना अर्ज दाखल करण्याचा अधिकार नाही.

वाराणसीतील ज्ञानवापीच्या व्यास तळघरात 31 जानेवारी रोजी रात्री उशिरा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पूजा सुरू करण्यात आली होती. 30 वर्षांनंतर पुन्हा ज्ञानवापी संकुलात नंदी महाराजांसमोरील व्यासजींच्या तळघरात असलेली पूजा सुरू करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Horoscope : जुना अबोला मिटेल,घरात उत्साहाचे वातावरण राहील; वाचा आजचे राशीभविष्य

Horoscope Today : आज विनाकारण शत्रुत्व ओढवून घ्याल, दानधर्मासाठी खर्च कराल; वाचा तुमच्या नशिबात आज काय लिहिलंय?

Fact Check : गणपतीसारख्या दिसणाऱ्या बाळाचा जन्म? काय आहे व्हायरल व्हिडिओमागचं सत्य?

Maharashtra Politics: महायुतीचं बेताल त्रिकूट; देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला नेत्यांकडून हरताळ

Save Mangroves : कांदळवन सुरक्षेसाठी १२० कोटी; १९५ ठिकाणं, ६६९ CCTV कॅमेरे, सरकारचा प्लान की पांढरा हत्ती?

SCROLL FOR NEXT