Gyanvapi ASI Survey Saam Tv
देश विदेश

Gyanvapi ASI Survey : ज्ञानवापी मशीद की मंदिर? काय आहेत ASIअहवालातील १० महत्त्वाचे पुरावे?

Gyanvapi : १७ व्या शतकात काशी विश्वनाथ मंदिराचा नाश झाल्यानंतर त्या जागी मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा हिंदू पक्ष सातत्याने करत आहेत. ASI अहवालातील १० महत्त्वाचे पुरावे काय आहेत ते जाणून घेऊया.

Bharat Jadhav

Gyanvapi ASI Survey :

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरात सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात अनेक महत्त्वाचे दावे केले आहेत. या दाव्यानुसार ज्ञानवापी मशीद मंदिराच्या जागेवर करण्यात आल्याचं स्पष्ट होत आहे. गुरुवारी रात्री १० वाजता वाराणसी जिल्हा न्यायालयात काशी विश्वनाथ मंदिराच्या जवळील ज्ञानवापी परिसरात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणद्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेचा अहवाल सादर करण्यात आलाय. १७ व्या शतकात काशी विश्वनाथ मंदिर नष्ट करून त्याजागी मशीद उभारण्यात आलं आहे, असा दावा हिंदू पक्ष वारंवार करत आहे. (Latest News)

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे पुरावे

हिंदू पक्षाचे वकील विष्णू शंकर जैन म्हणाले की, काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेली मशीद १७व्या शतकात औरंगजेबाच्या कारकिर्दीत मंदिर नष्ट करण्यात आले होते. त्यानंतर हिंदू मंदिराच्या अवशेषांवर हे मशीद बांधण्यात आली होती, असे अहवालावरून स्पष्ट झाले आहे. मशीदच्या आधी असलेल्या मंदिरात एक मोठा केंद्रीय कक्ष होता आणि उत्तरेकडे एक छोटा कक्ष होता.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सर्वेक्षणादरम्यान दोन तळघरात हिंदू देवतांच्या मूर्त्यांचे अवक्षेष सापडले. मशीद उभारण्यासाठी काही जुन्या मंदिराचे स्तंभ वापरण्यात आले आहेत. त्या स्तंभावर मशिदीचं बांधकाम करण्यात आले आहे. मंदिर तोडण्याचे आदेश आणि तारीख पारशी भाषेत नमूद करण्यात आले आहे. ज्ञानवापी परिसरात महामुक्ती लिहिलेला दगड मिळून आलाय. मशिदीच्या मागील पश्चिमी भिंतीवर एका मंदिराची भिंत आहे.

या भिंतीवर घंटाचे चित्र कोरण्यात आले तसेच भिंतीवर एक चिन्ह मिळून आले आहे. याचबरोबर भिंतीवर ब्रह्मकमळही कोरल्याचे आढळलंय. ज्ञानवापी संकुलातील तळघराचे छत ज्या स्तंभांवर आहे ते नगर शैलीतील मंदिराचे खांब आहेत. सर्वेक्षणात ३२ दगडी स्लॅब आणि दगड सापडले आहेत. यात आधी हिंदू मंदिर होतं याचा पुरावा देत आहेत. दगडी स्लॅबवरील शिलालेख देवनागरी, तेलगू आणि कन्नड भाषेत लिहिलेले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: आपल्या मालकासमोर काल एक जण 'जय गुजरात' म्हणाला, ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल|VIDEO

Dangerous Flowers: जगातील सर्वात सुंदर दिसणारी विषारी फुले कोणती? स्पर्श होताच जीवासाठी ठरतील घातक

Shocking: दुचाकीवरून आले अन् भाजप नेत्यावर झाडल्या गोळ्या, घटनेचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद; आरोपी फरार

Savaniee Ravindrra: नाकात नथ, केसात गजरा अन्…; सावनी रवींद्रच्या पहिल्याच वारी सफरच्या अनुभवातील खास क्षण

मुलींनी प्रेमात पडण्याचं योग्य वय काय?

SCROLL FOR NEXT