Crime News Saam tv
देश विदेश

Crime News: 'माहेरी जाऊ नकोस', रागाच्या भरात पोलिसाच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल

Gwalior Crime News: पतीनं माहेरी जाण्यास नकार दिल्याच्या रागातून एका महिलेनं टोकाचं पाऊल उचललं आहे. पाचव्या मजल्यावरून उडी घेत तिनं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना ग्वाल्हेरमध्ये घडलीय.

Bhagyashree Kamble

पतीनं माहेरी जाण्यास नकार दिल्याच्या रागातून पत्नीनं टोकाचं पाऊल उचललं आहे. पाचव्या मजल्यावरून उडी घेत तिनं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला आहे. ही धक्कादायक घटना ग्वाल्हेरमध्ये घडली असून, या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पतीनं रक्तबंबाळ झालेल्या पत्नीला रूग्णालयात नेण्यात आलं. मात्र, पत्नीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले आणि पतीच्या जबाबाच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती दिलीप राठोड हा पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहे. २०१७ साली दिलीप यांचा विवाह आरती राठौडसोबत झाला होता. दोघांना मुलगी निधी (वय वर्ष ६) आणि मुलगा विहान (वय वर्ष २) अशी दोन मुलं आहेत. पती दिलीपनं दिलेल्या जबाबानुसार, पत्नी तिच्या माहेरी जाण्यासाठी आग्रह करत होती.

मात्र, पतीने पत्नीला माहेरी जाण्यास नकार दिला होता. नकार दिल्यानंतर संतप्त महिलेला राग अनावर झाला. २३ जानेवारीला महिलेनं टोकाचे पाऊल उचलण्याचे ठरवले. इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत महिलेनं आयुष्य संपवले. आरती उंच इमारतीवरून पडल्यानंतर रक्तानं माखली होती. या घटनेची माहिती मिळताच पतीनं घटनास्थळी धाव घेतली.

पतीनं क्षणाचाही विलंब न करता थेट पत्नीला घेत रूग्णालय गाठले. उपचारादरम्यान आरतीचा दुर्देवी मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांनी आरतीच्या पतीचा जबाब नोंदवून घेतला. नंतर महिलेचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवले. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे आणि सरकार मधील कोंडी उपोषणाच्या 12 व्या दिवशीही कायम

Bigg Boss 20 : पहिल्या आठवड्यात नॉमिनेट झाले 'हे' स्पर्धक; घराला कोण करणार टाटा-बाय बाय? खेळाची रंगत वाढतेय

Ladki Bahin Yojana: 'या' महिलांच्या खात्यात जमा होणार ऑगस्टचे ₹१५००; यांचे पैसे कायमचे होणार बंद, पाहा महत्त्वाची अपडेट

Hemraj Shah : मोठी बातमी! ठाकरेसेनेच्या नेत्याचे मुंबईत निधन, राजकीय वर्तुळात शोककळा

मोठी बातमी: लंडनमध्ये ऐनवेळी विमानांचे मार्ग बदलले! उपमुख्यमंत्र्यांचे ६ अधिकारी स्वित्झर्लंडमध्ये अडकले; काय घडलं?

SCROLL FOR NEXT