MP News News
देश विदेश

MP News: प्रेयसीच्या बहिणीसोबत लफडं; गर्लफ्रेंडला कळलं अन् चप्पलीने तुडवत उतरवलं फ्लर्टिंगचं भूत

गर्लफ्रेंडने बहिणीसह मिळून तरुणाला धडा शिकवण्याचा कट रचला आणि पार्कमध्ये भेटण्यासाठी बोलवले.

Shivani Tichkule

MP Crime News: दोन बहिणींसोबत प्रियकराला फ्लर्ट कारण एका तरुणाला चांगलाच महागात पडलं आहे. भिंड येथील एका तरुणाचे एका मुलीवर प्रेम होते.मात्र, तो प्रेयसीसोबतच तिच्या एका बहिणीशीही देखील फ्लर्ट करत होता.

हा प्रकार प्रेयसीला कळताच तिने प्रियकराला एका पार्कमध्ये बोलावले आणि त्यानंतर तिने प्रियकराला चप्पलने चांगलाच तुडवलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही घटना 23 एप्रिलची असल्याची माहिती समोर आली आहे. (Latest Marathi news)

रविवारी दुपारी ग्वाल्हेरच्या झलकारीबाई पार्कजवळून काही लोक जात असताना एका मुलीचा मोठमोठ्याने ओरडण्याचा आवाज येत होता. लोकांनी पार्कमध्ये जाऊन पाहिले असता, एक तरुणी एका तरुणाला चप्पलने बेदम मारहाण करत होती. दरम्यान, लोक हे नाटक पाहत उभे होते. (Viral News)

मिळालेल्या माहितीनुसार, मारहाण झालेला तरुण हा भिंड जिल्ह्यातील मेहगावचा रहिवासी होता. त्याला मारहाण करणारी मुलगी दुसरी कोणी नसून त्याची प्रियासी आहे. सुमारे अर्धा तास हे नाट्य चालले. प्रियकराचे शर्ट काढून त्याची धिंड काढण्यावर मुलगी ठाम होती. मात्र आजूबाजूला उपस्थित असलेल्या लोकांनी तरुणीला समजावून सांगून प्रकरण शांत केले.

प्रियकर या मुलीवर प्रेम करायचा. दोघांमध्ये मोबाईलवर बोलणे व्हायचे. पण, काही दिवसांपूर्वीच तरुण या मुलीच्या बहिणीसोबत फ्लर्ट करत असल्याचे माहिती प्रियसीला मिळाली. दोन्ही बहिणी आपापसात बोलल्या तेव्हा या तरुणीचे वास्तव समोर आले. तो प्रियसीच्या बहिणीसोबत मोबाईलवर बोलायचा. प्रियकराचे कृत्य कळताच तरुणीने बहिणीसह मिळून तरुणाला धडा शिकवण्याचा कट रचला आणि पार्कमध्ये भेटण्यासाठी बोलवले.

यावेळी दोन्ही बहिणी घटनास्थळी हजर होत्या. दरम्यान, वीरांगना झलकारीबाई उद्यानात झालेल्या गोंधळाची माहिती कोणीतरी पोलिसांना दिली. पोलीस येण्यापूर्वीच हा वाद शांत झाला होता. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Socaila Media) व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Year Special: नवीन वर्षाच्या स्वागतासाठी घराच्या घरी बनवा टेस्टी प्लम केक

Maharashtra Live News Update: प्रशांत जगताप यांचा राजीनामा जवळपास निश्चित

Rubaab Teaser: तुझ्यासारखी नको तूच पाहिजे...,लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार एक रुबाबदार लव्हस्टोरी

Jabrata: टीव्हीची प्रसिद्ध जोडी मोठ्या पडद्यावर; चित्रपटाचं रोमॅंटिक गाणं प्रदर्शित, रिलीज डेट काय?

आता WhatsApp Chat नको असलेले डिलिट करा, हवे असलेले ठेवता येणार, नवं फीचर आलं, कटकट संपली!

SCROLL FOR NEXT