भारतातील अनेक राजकारण्यांचे गुरु महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू (व्हिडिओ) Saam Tv
देश विदेश

भारतातील अनेक राजकारण्यांचे गुरु महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू (व्हिडिओ)

प्रयागराज येथील गेस्ट हाउसमध्ये महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह आढळून आला आहे.

वृत्तसंस्था

प्रयागराज - अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी Nagendra Giri Maharaj यांचा संशयास्पद मृत्यू Death झाला आहे. प्रयागराज येथील गेस्ट हाउसमध्ये महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाजवळ पोलिसांना एक चिठ्ठी देखील आढळली आहे. या चिठ्ठीमध्ये त्यांनी आपण एका शिष्यामुळे दुःखी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या चिठ्ठीमध्ये त्यांनी त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता आनंद गिरी यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. पण पोलिसांनी या प्रकरणी अद्याप पर्यंत कुठलीही माहिती देण्यास नकार दिला आहे. महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हे देखील पहा -

या घटनेबाबदची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच आयजी केपी सिंह KP Singh आणि इतर वरिष्ठ अधिकारी यांनी देखील त्या जागेची पाहणी केली. प्राप्त माहितीनुसार, महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह गेस्ट हाउसमधील एका पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळून आला. तसेच ज्या घरात गिरी यांचा मृतदेह लटकलेला होता, त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते अशी माहिती समोर आली आहे.

नरेंद्र गिरी महाराज गेल्या काही दिवसांपासून मानसिक तणावतून जात होते. गेल्या अनेक दिवसांपासून नरेंद्र गिरी महाराज यांचा त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी वाद सुरु होता अशी माहिती समोर आली आहे. आनंद गिरी यांना नरेंद्र गिरी महाराज यांनी त्यांच्या आश्रमातून बाहेर काढले होते. त्यानंतर आनंद गिरी यांनी माफी देखील मागितली होती.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कराडमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांकडून निषेध

Assembly Election: बल्लारपूरमध्ये रंगणार तिरंगी लढत; सुधीर मुनगंटीवारांपुढे काँग्रेसच्या संतोष सिंह रावतांचं आव्हान

IND vs SA: निर्णायक सामन्यात टीम इंडियाचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय; पाहा प्लेइंग 11

World : जगातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? हनिमूनसाठी सर्वात रोमँटिक ठिकाण

School Holiday Update: शाळांना खरंच सलग ३ दिवस सुट्टी? शिक्षण आयुक्त म्हणाले, सरसकट नाहीच!

SCROLL FOR NEXT