Gujrat Assembly  Saam TV
देश विदेश

Gujrat Election 2022 : चंद्रकांत पाटील यांचा पत्ता कट; भूपेंद्र पटेल घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ

मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये अनेक नावं होती. मात्र सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी बाजी मारली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Gujrat Election Result 2022: गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. भाजप जवळपास 150 जागांहून अधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे.

आता भाजप मुख्यमत्रीपदी कुणाला संधी देणार याकडे लक्ष आहे. मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये अनेक नावं होती. मात्र सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी बाजी मारली आहे. (Latest Marathi News)

गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. येत्या 12 डिसेंबर रोजी दुपारी 2 वाजता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडेल. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देखील उपस्थित राहणार आहेत.

गुजरातमध्ये भाजप ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत असताना मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांचं देखील नाव होतं. चंद्रकांत पाटील हे मुळचे महाराष्ट्रातील जळगाव येथील आहेत. मात्र त्यांच्या जन्मावेळी गुजरात राज्य नव्हतं. गुजरात-महाराष्ट्र एकच राज्य असताना त्यांचं संपूर्ण कुटुंब सुरतला स्थायिक झालं. (Election 2022

पुढे चंद्रकांत पाटील वडिलांच्या जागी पोलिस सेवेत रुजू झाले. मात्र नोकरीत बड्या पोलिस अधिकाऱ्यांशी खडके उडू लागल्याने त्यांना पोलिस दलातून निलंबित करण्यात आलं. त्यानंतर 1989 मध्ये त्यांनी राजकारणात प्रवेश केला. 2009 मध्ये ते भाजपच्या तिकीटावर नवसारी मतदारसंघांतून पहिल्यांदा लोकसभेत पोहोचले. त्यानंतर ते तीन वेळा खासदार झाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: सांगोल्यातील अपक्ष उमेदवारावर पाठिंब्यासाठी दबाव; निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे तक्रार

Pune Crime : कपड्याच्या दुकानातून पावणे चार लाखांची रोकड लंपास; चोरटे सीसीटीव्हीत कैद

Women Qualities: महिलांच्या या सवयीचं पुरूषांकडून होतं कौतुक, जिंकतात हृदय

Parenting Tips: मुलांना शिस्त लावायची आहे? मग पालकांनी ही चूक कधीच करु नका अन्यथा...

Maharashtra Election : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात दोन्ही सेनेचे शिवसैनिक आमनेसामने; पुढे नेमकं काय घडलं? वाचा

SCROLL FOR NEXT