Gujarat Terrible Accident  Saamtv
देश विदेश

Gujarat Terrible Accident: कार आणि पिकअप टेम्पोचा भीषण अपघात; 17 मजूर गंभीर

गुजरात राज्यामधील नवसारी येथे मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर वेस्मा गावाजवळच कार आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात झाला.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृत्तसंस्था: गुजरात (Gujarat) राज्यामधील नवसारी येथे मुंबई (Mumbai)- अहमदाबाद (Ahmedabad) राष्ट्रीय महामार्गावर (National Highways) वेस्मा गावाजवळच कार आणि पिकअप वाहनाचा भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे. या भीषण अपघातामध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) मजूर जखमी झाले आहेत. नवापुर (Navapur) तालुक्यातील दुधवे येथील मजूर नवसारी जिल्ह्यात (district) हांसापूरहून सुरत (Surat) जिल्ह्यामधील ओलापाड येथे भात कापणीकरिता जात असताना हा भीषण अपघात झाला असल्याची माहिती गुजरात पोलिसांनी (police) दिली आहे. (Gujarat Terrible accident car pickup tempo)

हे देखील पहा-

कार क्रमांक GJ-१५ CJ- ९४९२ चा टायर फुटल्यामुळे कार महामार्गावर पलटी झाली आहे. या कारच्या पाठीमागे असणारी मजुरांनी (laborers) भरलेली पिकअप वाहन (क्रमांक GJ-१९ X-१०६३) कारवर जोरदार आदळली आहे. यामुळे पिकअप टेम्पो देखील रस्त्यावर पलटी झाला आहे. यामध्ये १७ मजूर रस्त्यावर जोरदार फेकले गेले. यामध्ये महिला आणि लहान बालकांसह मजूर जखमी झाले आहेत. कारमधील २ प्रवासी देखील गंभीर जखमी झाले आहेत. हा भीषण अपघात होताच स्थानिक नागरीक मदतीकरिता धावून आले आहेत.

अपघातामध्ये जखमी झालेल्या मजुरांना तातडीने इतर वाहनांमधून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नवापूर तालुक्यातील दुधवे आणि मेनतलाव गावामधील मजूर गुजरात राज्यामध्ये मजुरीकरिता कामाला गेले होते. नवसारीहून सुरतकडे जात असताना रविवारी संध्याकाळी हा भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १७ मजुर जखमी झाले आहेत. काही मजुरांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर नवसारी सरकारी रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहेत. अपघात दरम्यान काही काळ महामार्गावर वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प झाली होती. नवसारी सरकारी रुग्णालयात जखमी मजुरांवर उपचार सुरू आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Death : २५ वर्षीय CA ने आयुष्य संपवलं, फुगे फुगवण्याच्या गॅसची नळी तोंडात घातली अन्... तरुणाची अवस्था पाहून पोलिसही हडबडले

Medha Rana: बॉर्डर २ मध्ये झळकणारी मेधा राणा कोण? जाणून घ्या

Pune Rave party Case : प्रायव्हेट व्हिडिओ व्हायरल, एकनाथ खडसे यांच्याकडून गंभीर आरोप; पुणे पोलीस आयुक्तांकडून स्पष्टीकरण

Raigad : रायगडमध्ये मासेमारी बंदीच्या आदेशाचे उल्लंघन! 38 मच्छिमारांवर कारवाई | VIDEO

दह्यासोबत हे पदार्थ चुकूनही खाऊ नका, फूड पॉयझनचा असतो धोका

SCROLL FOR NEXT