Gujarat News: Saamtv
देश विदेश

Gujarat News: घरात वाढदिवसाची तयारी सुरू होती अन्... बर्थ डे'च्या दिवशीच महिलेचा दुर्दैवी मृत्यू; कुटूंबीयांवर शोककळा

Rajkot News: निशिता बेन राठोड यांना २ मुले आणि १ मुलगी आहे. आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मुले तयारी करत होती.

Gangappa Pujari

Women Death On Birthday: गुजरातमधील (Gujarat) राजकोटमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जेवण बनवत असतानाच ह्रदयविकाराचा झटका आल्याने ३६ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे त्याच दिवशी मृत महिलेचा वाढदिवस होता ज्याची घरात जय्यत तयारी सुरू होती. पण क्षणात ही घटना घडल्याने कुटूंबावर दुखःचा डोंगर कोसळला आहे..

याबाबत अधिक माहिती अशी की, निशिता बेन राठोड (Nishita Rathod) असे मृत महिलेचे नाव असून त्या घरात भाकरी बनवत होत्या. अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि काही सेकंदातच ती अचानक बेशुद्ध पडली. कुटुंबीयांनी तात्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. जिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

महिलेच्या पोस्टमॉर्टममध्ये मृत्यू हृदयविकाराच्या (Heart Attack) झटक्याने झाल्याचे स्पष्ट झाले. एकीकडे घरात वाढदिवसाची तयारी सुरू असतानाच काळाने घाला घातल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या दुर्देवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

निशिता बेन राठोड यांना २ मुले आणि १ मुलगी आहे. आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सर्व मुले तयारी करत होती. मात्र ही दुर्देवी घटनेने संपूर्ण कुटूंब शोकसागरात बुडाले. पोस्टमोर्टम रिपोर्टनुसार, गर्भाशयाची पिशवी फाटल्याने महिलेला हृदयविकाराचा झटका आला. निशिता बेनला कुठलाही अन्य आजार नव्हता.. असेही डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nishikant Dubey Anti-Marathi : मराठी माणसाला डिवचा, प्रसिद्धी मिळवा; लालू, अमरसिंहनंतर आला निशिकांत दुबे

Pakistan : पाकिस्तानात होणार सत्तापालट? असीम मुनीर होणार राष्ट्रपती? बिलावल भुट्टोच्या विधानामुळे खळबळ

Russia News : पुतिन यांनी मंत्रिमडळातून काढलं; काही तासांतच मंत्र्याने आयुष्य संपवलं, जगात खळबळ

Shravan Somvar: पहिल्या श्रावण सोमवारी करा 'असे' उपाय, महादेव होतील प्रसन्न

Maharashtra Politics: MIM ने शोधला 'वंचित'ला पर्याय? महाराष्ट्राच्या राजकारणात 'रावण'ची एण्ट्री महाराष्ट्रात 'MD' फॅक्टर किंगमेकर?

SCROLL FOR NEXT