Gujarat Wall Collapse 4 Child Death Saam TV
देश विदेश

Gujarat Wall Collapse: मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली; ४ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू, मन सुन्न करणारी घटना

Gujarat Wall Collapse: मन सुन्न करणारी ही घटना हलोल तालुक्यातील चंद्रपुरा गावात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

Satish Daud

Gujarat Wall Collapse: सध्या देशभरात मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली असून काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या देखील घटना समोर येत आहे. अशातच गुजरातमधून एक भयानक घटना उघडकीस आली आहे. येथे एका झोपडीवर भिंत कोसळून ४ मुलांचा दुर्देवी मृत्यू झाला.

याशिवाय दुर्घटनेत (Accident) ५ जण जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मृतांमध्ये तीन सख्ख्या भावांचा समावेश असून चारही मुलांचे वय ५ वर्षांपेक्षा कमी आहे. मन सुन्न करणारी ही घटना हलोल तालुक्यातील (Gujarat News) चंद्रपुरा गावात गुरूवारी सायंकाळच्या सुमारास घडली.

या घटनेनं परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, पीडित कुटुंब मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील रहिवासी आहे. काही दिवसांपूर्वी पीडित कुटुंबिय पोट भरण्यासाठी हलोल तालुक्यातील चंद्रपुरा गावात आले होते.

येथे असलेल्या एका रासायनिक कारखान्याजवळील बांधकामाच्या ठिकाणी मजूर म्हणून काम करत होते. जवळच असलेल्या कारखान्याच्या भितींशेजारी त्यांनी झोपड्या बांधल्या होत्या. दरम्यान, गुरूवारी गुजरातमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस झाला.

पावसामुळे काम बंद असल्याने आपल्या लेकरांसह ते झोपडीतच होते. दरम्यान, मुसळधार पावसाने कारखान्याची भिंत कोसळून थेट झोपड्यांवर पडली. या दुर्घटनेत झोपडीत खेळत असलेल्या ४ चिमुकल्यांचा जागीच मृत्यू झाला. याशिवाय ५ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Recruitment: रेल्वेत सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; ६५६५ पदांसाठी होणार भरती; रेल्वे मंत्रालयाने दिली मंजुरी

हृदयद्रावक! दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून एकाच कुटुंबातील 9 जणांचा मृत्यू; मृतांची नावे आली समोर

Maharashtra Live News Update : बिबट्याची दहशत, उन्हाचा तडाखा आणि गारपिटीचा कहर; मेंढपाळांवर तिहेरी संकट

Gold Price Today: सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात मोठा बदल, वाचा २२ अन् २४ कॅरटचे आजचे दर

Namo Shetakri Yojana: शेतकऱ्यांनो नमो शेतकरी योजनेचे ₹२००० मिळाले का? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT