Gujarat News Saam Digital
देश विदेश

Gujarat News: एटीएसची मोठी कारवाई; अहमदाबाद विमानतळावर ISIS च्या ४ दहशतवाद्यांना अटक

Ahmedabad Airport : एटीएसने गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई करत इसिसच्या ४ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. केंद्रीय एजन्सींनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे चौघांना अटक केल्याची माहिती आहे.

Sandeep Gawade

एटीएसने गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई करत इसिसच्या ४ संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. केंद्रीय एजन्सींनी दिलेल्या गुप्त माहितीच्या आधारे चौघांना अटक केल्याची माहिती आहे. ऐन निवडणुकीत केलेल्या या कारवाईनंतर एकच खळबळ उडाली आहे. अटक करण्यात आलेले सर्वजण मूळचे श्रीलंकेचे रहिवाशी आहेत. हे दहशतवादी अहमदाबादला का आले होते, तिथे कोणाच्या संपर्कात होते का याचा तपास सध्या तपास यंत्रणांकडून सुरू आहे.

केंद्रीय एजन्सीकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर एटीएसकडून विमानतळाची झडती घेण्यात आली आणि मूळचे श्रीलंकेचे नागरिक असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या चौघांचा गुजरात किंवा अन्य राज्यात काही संबंध आहे का, याचा तपास करण्यात येत आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा गेल्या काही दिवसांपासून अहमदाबात विमानतळावर सोन्याच्या तस्करीवर नजर ठेवून आहेत. त्यादरम्यान तपास यंत्रणांना काही इसिस या दहशतवादी संघटनेशी संबंधित संशयित विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे विमानतळावर गस्त वाढवण्यात आली होती.

केंद्रीय यंंत्रणाच्या माहितीच्या आधारे एटीएसचं पथक बराचा काळ लक्ष्य ठेवून होतं. अखेर विमानतळावर एक व्यक्ती संशयित आढळली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने आणखी तिघांची नावं सांगितली. त्यानंतर सर्वांना ताब्यात घेतलं. चारही संशयित इसिस या दहशतवादी संघटनेशी बऱ्याच काळापासून संपर्कात असल्याचं तपास यंत्रणांनी सांगितलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

National Pension Scheme: केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारच्या 'या' योजनेवर मिळणार नवीन सूट

Water Drinking Rules: पाणी पिण्याचे 'हे' 4 सोपे नियम पाळा, आणि आजारांपासून दूर राहा

Maharashtra Live News Update: मराठी भाषेसाठी एकत्र येण्याचं आवाहन, मनसेकडून विजयी मेळाव्याचे बॅनर

Chocolate Milkshake Recipe: स्नॅक्स टाइमसाठी १० मिनिटात बनवा यम्मी चॉकलेट मिल्कशेक

SCROLL FOR NEXT