Gujrat Accidents Latest News Saam TV
देश विदेश

भयंकर! कॉंग्रेस आमदाराचा जावई दारू पिऊन सुसाट; कारने ६ जणांना चिरडलं

पोलिसांनी कॉंग्रेस आमदाराच्या जावयावर हिट अँड रन केसची तक्रार दाखल केली

Satish Daud

अहमदाबाद : गुजरातमधील (Gujrat) आनंद जिल्ह्यात एक भयंकर घटना घडली. भरधाव वेगात जाणाऱ्या कारने ऑटो रिक्षा आणि दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. ही धडक (Accident) इतकी भीषण होती की, यामध्ये दुचाकीस्वारासह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला. भरधाव वेगात कार चालवणारी व्यक्ती ही गुजरातमधील कॉंग्रेस आमदार पूनम परमार यांचा जावई असल्याचं बोललं जात आहे. (Gujrat Congress Mla Son In Law Car Accident Latest News)

याप्रकरणी अहमदाबाद पोलिसांनी कॉंग्रेस आमदाराच्या जावयावर हिट अँड रन केसची तक्रार दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात गुजरातमधील आनंद जिल्ह्यात घडला. कारने ज्या रिक्षाला धडक दिली. त्या रिक्षातून ४ प्रवासी प्रवास करीत होते.

रिक्षामधील चारही लोक एकाच कुटुंबातील असून आईसोबत २ मुली होत्या. ज्या भावाला राखी बांधून घरी परतत होत्या. तर बाईकवर २ जण होते. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ४ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर दोन जणांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, हा अपघात कॉंग्रेस आमदार पूनम परमार यांचा जावई केतन पधियार हा जबाबदार असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. जेव्हा हा अपघात झाला तेव्हा केतन पधियार हा दारूच्या नशेत असल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंडसंहिता ३०४ अंतर्गंत आरोपीला अटक केली आहे. या भीषष अपघातात आतापर्यंत ६ जणांचा मृ्त्यू झाला. तर आरोपीच्या ड्रायव्हरवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: तळोजा येथील अगरबत्ती बनवणाऱ्या कंपनीत भीषण आग...

Box Office Collection: 'धुरंधर'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची कमाई

Gajkesari Rajog 2026: 2 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 12 वर्षांनी बनणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग

earthquake : महाराष्ट्रा शेजारील राज्य भूकंपाने हादरले, साखरझोपेत असताना जाणवले धक्के

Latur : हार्वेस्टरमध्ये ऊस टाकताना तोल गेला, मशीनमध्ये अडकून शरीराचे तुकडे तुकडे झाले, लातूरमध्ये शेतकऱ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT