Gujarat car catches fire after overturning  AI Image
देश विदेश

Accident News : भरधाव कारचा मध्यरात्री भीषण अपघात, ३ जणांचा होरपळून मृत्यू

Gujarat Junagarh Accident News : गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यात केशोद-बालागाम मार्गावर भरधाव कार उलटून पेटली. भीषण आगीत तिघांचा होरपळून मृत्यू झाला, तर कारमधून बाहेर फेकली गेल्याने तरुणीचे प्राण वाचले.

Alisha Khedekar

Gujarat Junagadh Car Accident 3 Burnt गुजरातमधील जुनागढ जिल्ह्यात भीषण अपघात घडला आहे. केशोद-बालागाम मार्गावर खमीदाणा गावाजवळ भरधाव कार अचानक चालकाच्या नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या अपघातानंतर कारने पेट घेतल्याने मोठी दुर्घटना घडली. कारमधील तीन जणांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला. तर कारमधून बाहेर फेकली गेल्यामुळे एका तरुणीचे प्राण वाचले आहेत. मात्र, ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी ही कार केशोद-बालागाम मार्गावरून जात होती. त्यावेळी खमीदाणा गावाजवळ चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे भरधाव कार रस्त्यावर उलटली. कार उलटताच काही क्षणांतच तिने पेट घेतला. आगीने काही वेळातच संपूर्ण गाडीला वेढा घातला. त्यामुळे कारमध्ये असलेल्या प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही.

या दुर्घटनेत एक तरुणी कारमधून बाहेर फेकली गेली. त्यामुळे तिचे प्राण वाचले. अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने १०८ रुग्णवाहिकेतून केशोद येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले आहेत. या भीषण घटनेमुळे तरुणी मानसिक धक्क्यात असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी मोठ्या प्रयत्नांनंतर कारमधील आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. आग विझवल्यानंतर गाडीमध्ये तीन जणांचे मृतदेह आढळून आले. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरू केला आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जाणार आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Problems : रात्री सारखे सारखे झोपेतून जागे होताय? असू शकतात 'ही' ५ कारणे

Maharashtra News Live Update: निवतीच्या समुद्रात म्हातारी चूळ बघायला पर्यटकांची गर्दी

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात मोठा धमाका! ६% इन्क्रिमेंटसह जुनी पेन्शनही मिळणार?

How To Keep Lizards Away: घरात पालींचा सुळसुळाट झालाय? खोली अशा पद्धतीने करा पेंट, आसपासही फिरकणार नाही पाल

Shocking : ब्रेकअपचा राग अनावर! बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडचं घर पेटवलं; डोंबिवलीत खळबळ

SCROLL FOR NEXT