Jammu and Kashmir Saam Tv
देश विदेश

Jammu and Kashmir: श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ला पोलिसांसह 20 जण जखमी; एका नागरिकाचा मृत्यू

अमीरकदल येथे सुरक्षा दलाची तुकडी तैनात होती. त्यांच्यावर ग्रेनेड हल्ला करण्यात आला. नेम चुकल्यामुळे ग्रेनेडचा दुसऱ्या ठिकाणी स्फोट झाला.

साम वृत्तसंथा

श्रीनगरच्या (Shrinagar) अमीरकदलमध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर ग्रेनेडने हल्ला केला. या ग्रेनेडच्या स्फोटात एका पोलीस कर्मचाऱ्यासह 20 जण जखमी झाले. यात गंभीर जखमी झालेल्या एका नागरिकाचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या स्फोटानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आहे.

सुरक्षा दलांनी (Army) या क्षेत्राला वेढा घातला आहे. दहशतवाद्यांचा शोध सुरु आहे. सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे. या त एक महिला गंभीर जखमी आहे.

अमीराकदलमध्ये सुरक्षा दलाची एक तुकडी तैनात होती. यावेळीच ग्रेनेड हल्ला झाला. ग्रेनेडचा नेम चुकल्यामुळे ग्रेनेड दुसरीकडे फुटला. दहशतवाद्यांचा शोध सुरू असल्याचे आयजी विजय कुमार म्हणाले.

श्रीनगर (Shrinagar) शहरातील आलमगिरी मार्केटमध्ये रस्त्याच्या कडेला एक संशयास्पद वस्तू आढळल्याने शनिवारी घबराट पसरली होती. माहिती मिळताच पोलीस आणि सीआरपीएफचे अधिकारी आणि जवान घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी परिसरातील वाहतूक थांबवली. (Jammu and Kashmir)

सुरक्षा दलांनी बॉम्ब निकामी पथकाला घटनास्थळी पाचारण केले, त्यांनी संशयास्पद वस्तू सुरक्षित ठिकाणी नेत असताना ती नष्ट केली. त्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. मात्र, तपासादरम्यान रस्त्याने जात असताना दुचाकीस्वाराची बाटली पडल्याचे आढळून आले.

तपासादरम्यान एका दुकानात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीचे (CCTV) फुटेज पाहण्यात आले असून ही बाटली एका वृद्ध व्यक्तीच्या सायकलवरून पडल्याचे आढळून आले आहे अशी माहिती एसएसपी राकेश बलवाल यांनी दिली.

Edited by-Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT