LPG Cylinder Saam TV
देश विदेश

LPG Cylinder : दिवाळीआधी गरिबांना मोदी सरकारचं 'गिफ्ट'; अवघ्या ६०० रुपयांत मिळणार गॅस सिलिंडर

LPG Cylinder Price : उज्ज्वला लाभार्थीची सबसिडीची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आली आहे.

प्रविण वाकचौरे

New Delhi News :

केंद्रीय मंत्रिमंडळाने सर्वसामान्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रिमंडळाने उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवले ​​आहे. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजीच्या दरात २०० रुपयांची कपात करण्याची घोषणा मंत्रिमंडळाने केली होती.

आता उज्ज्वला लाभार्थीची सबसिडीची रक्कम २०० रुपयांवरून ३०० रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना आता 600 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार आहे. (Latest News)

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितलं की, पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. रक्षाबंधन आणि ओणमच्या निमित्ताने एलपीजी सिलिंडरची किंमत २०० रुपयांनी कमी केले होते.

सिलिंडरची किंमत ११०० रुपयांवरून ९०० रुपयांपर्यंत कमी झाली होती. उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना ७०० रुपयांना सिलिंडर मिळत होता. आता उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांच्या ३०० रुपये अनुदान मिळणार आहे. त्यामुळे सिलिंडर अवघा ६०० रुपयांना मिळणार आहे. (Finance News)

घरगुती गॅस सिलिंडरची किंमत?

महिन्याभरापूर्वी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत २०० रुपयांनी कपात केली होती. यानंतर 1 ऑक्टोबर रोजी घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत १४.२० किलोचा घरगुती गॅस सिलिंडर ९०२.५० रुपये, दिल्लीत ९०३ रुपये, कोलकात्यात ९२९ रुपये आणि चेन्नईमध्ये ९१८.५० रुपयांना उपलब्ध आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मंत्री नरहरी झिरवळांच्या मतदारसंघात एसीबीची मोठी कारवाई

Cucumber Water Benefits: रोज सकाळी काकडीचे पाणी फायदे प्यायल्याने होतात 'हे' आरोग्यदायी फायदे

Brain activity after death: मृत्यूनंतरही आजूबाजूचा आवाज व्यक्ती ऐकू शकते? नव्या संशोधनातून धक्कादायक बाब समोर

Rain Alert : महाराष्ट्रावर अवकाळीचं संकट कायम, विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Onion Export: कांद्याचं धोरण, शेतकऱ्याचं मरण; निर्यात धोरणाचा कांद्याला फटका?

SCROLL FOR NEXT