Former Haryana Deputy Speaker and senior BJP leader Gopichand Gehlot passes away at the age of 75. Saam Tv
देश विदेश

भाजपच्या दिग्गज नेत्याचे निधन! राजकीय वर्तुळात शोककळा

Bjp Leader Gopichand Gehlot Death Haryana News: हरियाणाचे माजी उपसभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीचंद गेहलोत यांचे 75 व्या वर्षी निधन झाले. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या गेहलोत यांच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे.

Saam Tv

हरियाणा विधानसभेचे माजी उपसभापती गोपीचंद गेहलोत यांचे शनिवारी निधन झाले. ते 75 वर्षांचे होते. गेहलोत गेल्या चार वर्षांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते आणि त्यांचे डायलिसीस सुरू होते. ते 2000 साली गुरुग्राम विधानसभेतून अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. 2019 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेहलोत एक मनमिळाऊ व्यक्ति होते आणि सर्वच राजकीय पक्षासोबत त्यांचे घनिष्ठ संबंध होते. सर्व पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

2019 मध्ये केला भाजपमध्ये प्रवेश

2000 साली गुरुग्रामची जागा जिंकल्यानंतर गेहलोत यांनी इंडियन नॅशनल लोक दल सरकारमध्ये ते विधानसभेचे उपसभापती होते. ते चौटाला कुटुंबाच्या जवळचे असल्याचे म्हटले जाते आणि त्यांनी 2005 आणि 2014 मध्ये आयएनएलडीच्या तिकिटावर गुरुग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र त्यांचा दोन्ही वेळा पराभव झाला. गेहलोत हे हरियाणातील एक ज्येष्ठ आमदार होते. त्यांनी अपक्ष आमदार म्हणून विधानसभेत प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांनी 2019 साली भाजपमध्ये प्रवेश केला.

मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी ट्विट करत त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. ते म्हणाले, हरियाणा विधानसभेचे माजी उपसभापती गोपीचंद गेहलोत यांच्या निधनाची बातमी अत्यंत दु: खद आहे. त्यांचा विनम्र स्वभाव आणि लोककल्याणासाठीचे समर्पण सदैव स्मरणात राहील. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ति देवो

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्वरांचा 'सप्तक' पोरका; आशाताईंच्या जाण्याने संगीताचा सुवर्णकाळ हरपला, उपमुख्यमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली

Gold Rate: सोनं-चांदीने उच्चांक गाठला, आठवडाभरात किती रुपयांनी वाढले, वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

Success Story: शेतकऱ्याच्या लेकीची यशाला गवसणी, पहिल्याच प्रयत्नात महसूल सहाय्यक पदावर निवड

Who Is Zanai Bhosle: कोण आहे जनाई भोसले? आशा भोसले यांच्याशी आहे खास कनेक्शन

Stampede : चेंगराचेंगरीत ३० जणांचा मृत्यू, ऐतिहासिक किल्ल्यावरील उत्सवात गदारोळ

SCROLL FOR NEXT