Monsoon Update Saam tv
देश विदेश

Mumbai Monsoon 2023: आनंदाची बातमी! मान्सूनच्या आगमनाची तारीख आली समोर, या दिवशी मुंबईत दाखल होण्याची शक्यता!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Delhi News: देशभरातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने (India Meteorological Department) सलग पाचव्या वर्षी देशामध्ये सामान्य पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. फक्त देशातील शेतकऱ्यांसाठी नाही तर सामान्य जनतेसाठी देखील ही खूपच आनंदाची बातमी आहे.

मान्सूनच्या (Monsoon 2023) मध्यभागी मध्यम एल निनो येण्याचा धोका असला तरी देशामध्ये सरासरीच्या ९६ टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे, हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मंगळवारी ही माहिती दिली.

डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, मान्सूनच्या चार महिन्यांमध्ये म्हणजेच जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये ८७ सेंटीमीटर पाऊस पडतो. हा आकडा 1971 -2020 च्या आकड्यांवर आधारित आहे. यावर्षी 87 सेंटीमीटरचा ९६ टक्के म्हणजे ८३.५ सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस सामान्य पावसाप्रमाणेच आहे. सध्या देशामध्ये ६० टक्के शेती ही पावसावर अवलंबून आहे.

हवामान खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतामध्ये २०१९ मध्ये मान्सून दरम्यान ९७१.८ मिमी पाऊस पडला. २०२० मध्ये ९६१.४ मिमी, २०२१ मध्ये ८७४.५ मिमी आणि २०२२ मध्ये ९२४.८ मिमी पाऊस पडला होता. दरम्यान, एल नीनोमुळे दक्षिण अमेरिकेजवळील प्रशांत महासागरातील विषुववृत्ताभोवती सामान्य तापमानापेक्षा जास्त उष्ण तापमान असते. हे मान्सूनचे वारे कमकुवत होण्याशी आणि भारतात कमी पाऊस पडण्याशी संबंधित आहे.

मृत्युंजय महापात्रा यांनी पुढे असे सांगितले की, उत्तर पश्चिम भारत, पश्चिम मध्य आणि पर्वोत्तर क्षेत्रांमध्ये दक्षिण पश्चिम मान्सूनच्या दरम्यान सामान्य आणि सामान्यपेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर, द्वीपकल्पीय प्रदेश, लगतचा पूर्व मध्य, पूर्व, ईशान्य प्रदेश आणि वायव्य भारताच्या काही भागात सामान्य पाऊस पडू शकतो.

देशामध्ये मान्सूनचे आगमन होण्याची सामान्य तारीख ही एक जून आहे. मान्सून सर्वात आधी केरळमध्ये दाखल होते. त्यानंतर तो हळूहळू पुढे सरकरत देशभरातील इतर भागामध्ये दाखल होतो. पण मान्सून कधी दाखल होणार याची भविष्यवाणी ही १५ मेच्या आसपास केली जाते. तसंच देशाच्या कोणत्या भागात किती टक्के पाऊस पडणार याचा अंदाज देखील जूनमध्ये जारी केला जातो.

देशात मान्सूनच्या आगमनाच्या तारखा -

केरळ - १ जून

चेन्नई - ४ जून

मुंबई - ११ जून

रायपूर - १६ जून

वाराणसी - २० जून

आगरा - ३० जून

दिल्ली - २७ जून

चंदीगड - २६ जून

लडाख - २३ जून

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT