Gold-Silver Price  Saam TV
देश विदेश

Gold-Silver Price : सोन्याच्या दरात मोठी वाढ; चांदी मात्र घसरली, जाणून घ्या आजचा भाव

आज म्हणजेच शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. MCX वर, सोन्याचा भाव 0.03 टक्क्यांनी वाढला आहे.

Satish Daud

Gold-Silver Price : गेल्या काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold) दरात चढउतार होत आहे. याचाच परिणाम भारतीय सराफा बाजारावर दिसून येत आहे. आज म्हणजेच शुक्रवारी सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली. MCX वर, सोन्याचा भाव 0.03 टक्क्यांनी वाढला आहे. त्याचवेळी, चांदीचा (Silver) दर 0.09 टक्क्यांनी कमी झाला आहे. (Gold Silver Price Today)

काय आहे आजचा सोन्याचा भाव?

मल्टी कमोडिटी एक्स्चेंज (MCX) वर, गुरूवारी सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली होती. सोन्याचा भाव 438 रुपयांनी महागून 50,960 रुपयांवर पोहचला होता. दरम्यान, आजही सोन्याच्या दरात तब्बल 600 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 24 कॅरेट शुद्धतेच्या सोनाचा भाव प्रतितोळा 52 हजारांवर गेला आहे. 24 कॅरेट सोन्याचा सध्याचा भाव प्रतितोळा 52 हजार 124 इतका आहे.

आजचा चांदीचा भाव काय?

एकीकडे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असली, तरी चांदीच्या भावात मात्र घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर चांदीच्या दरात 0.06 टक्क्यांनी घसरण झाली. त्यामुळे एक किलो चांदाचा भाव 61,853 रुपयांवर आला आहे. सराफा बाजार उघडताच, चांदीचा भाव 62,005 रुपयांवर गेला होता. मात्र, त्यानंतर चांदीच्या भावात मोठी घसरण झाली.

आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली. शुक्रवारी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याची किंमत 2.71 टक्क्यांनी वाढून 1,751.91 डॉलर प्रति औंस झाली. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही चांदीची किंमत वाढली आहे. चांदीची स्पॉट किंमत 3.00 टक्क्यांनी वाढून 21.65 डॉलर प्रति औंस झाली आहे.

मिस्ड कॉल देऊन सोन्याचे दर मिळवा

सोन्या-चांदीची किंमत तुम्ही घरबसल्या सहजपणे जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्हाला फक्त 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल द्यावा लागेल. तुमच्या फोनवर मेसेज येईल. त्यात तुम्ही सोन्या चांदीचे अधिकतम दर मिळवू शकता.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT