Gold Silver Price Hike
Gold Silver Price Hike Saam Tv
देश विदेश

Gold Silver Price Hike : लग्नसराईत मोठा धक्का ! सोन्याच्या दरात मोठी वाढ, चांदीही महागली, वाचा आजचे दर

कोमल दामुद्रे

Sona Chandi Bhav : मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढउतार दिसून येत आहे. याचा परिणाम भारतीय बाजारपेठांवरही पाहायला मिळतं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण सोबत वाढही सुरू होती.

काल सोन्याचा भाव 880 रुपयांनी तर चांदीचा भाव एक किलो मागे 700 रुपयांनी वाढला होता. त्यात आज ऐन लग्नसराईच्या वेळी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे.

गुड रिटर्न्सच्या  वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 57,160 रुपये तर 24 कॅरेट साठी 62,340 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 771 रूपये आहे. (Gold Silver Price update 5th May 2023)

1. तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

चेन्नई - 62,740 रुपये

दिल्ली - 62,340 रुपये

हैदराबाद - 62,190 रुपये

कोलकत्ता - 62,190 रुपये

लखनऊ - 62,340 रुपये

मुंबई - 62,190 रुपये

पुणे - 62,190 रुपये

नागपूर - 62,190 रुपये

2. काल सकाळचे दर

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,500 रुपये तर 24 कॅरेट साठी 61,640 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 761 रूपये आहे. (Gold Silver Price update 4th May 2023)

3.  हॉलमार्कचे (Hallmark) सोनं कसे खरेदी कराल?

सोनं (Gold) खरेदी करताना आपण त्याची गुणवत्ता तपासायला हवी. हॉलमार्कचे चिन्ह असल्यावरच ते खरेदी करा. यामध्ये याची हमी सरकार आपल्याला देते. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते. हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स अॅक्ट, नियम आणि नियमन अंतर्गत कार्य करते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yamaha च्या या स्कूटरमध्ये मिळेल 21 लीटर अंडरसीट स्टोरेज, 49 Kmpl मायलेज; जाणून घ्या किंमत

Upcoming Bikes: मार्केट होणार जाम! जूनमध्ये लॉन्च होणार Royal Enfield Guerrilla 450; किती असेल किंमत?

24GB RAM आणि 50MP कॅमेरा असलेल्या फोनवर मिळत आहे 23,000 रुपयांची सूट, जाणून घ्या काय आहे ऑफर

GT vs KKR : गुजरातचं प्लेऑफचं स्वप्न पावसात गेलं वाहून; GT vs KKR सामना एकही चेंडू न टाकता रद्द

Sushil Kumar Modi: बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, वयाच्या ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT