Gold-Silver Price Today Saam Tv
देश विदेश

Gold-Silver Price Today : खुशखबर ! सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरला, पाहा आजचे नवे दर

Gold Silver Rate In Maharashtra : आठवड्याच्या पहिल्याच दिवशीपासून सोन्याचा दरात किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.

कोमल दामुद्रे

Sone Chandi Bhav: मागच्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या भावात चढ-उतार आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यातच लग्नसराई व अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सर्वसामन्यांसाठी सोने खरेदी करणे कठीणच झाले आहे. परंतु, आठवड्याच्या पहिल्याच दिवशीपासून सोन्याचा दरात किंचित घसरण पाहायला मिळाली आहे.

येत्या काही दिवसात अक्षय्य तृतीयाच्या शुभ मुहूर्तावर ग्राहकांना सोने (Gold) खरेदी करता येऊ शकते. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार (Website) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याची किंमत 55,840 रुपये तर 24 कॅरेट साठी 60,910 रुपये आहे तर आज 10 ग्रॅम चांदी 774 रूपये आहे. (Gold Silver Price update 19 April 2023)

1. जाणून घ्या तुमच्या शहरातील 24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव

चेन्नई - 61,590 रुपये

दिल्ली - 61,060 रुपये

हैदराबाद - 60,910 रुपये

कोलकत्ता - 60,910 रुपये

लखनऊ - 61,060 रुपये

मुंबई (Mumbai) - 60,910 रुपये

नागपूर - 60,910 रुपये

पुणे - 60,910 रुपये

2. 22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबईत म्हाडाचं फक्त 31 लाखांमध्ये घर; शहरात कुठे कुठे फ्लॅट उपलब्ध? वाचा सविस्तर

Chandan Face Pack: चमकदार त्वचेसाठी चंदनाचा फेसपॅक कसा बनवायचा? त्यामध्ये काय काय टाकायचे?

प्रसिद्ध मराठमोळ्या रीलस्टारवर कोसळला दु:खाचा डोंगर; कुटुंबातील जवळच्या सदस्याचं निधन

Maharashtra Live News Update: आ हर्षवर्धन सपकाळ यांनी शिवप्रेमींप्रती केली दिलगिरी व्यक्त

कुणाल कामरा वर्षभरानंतर मुंबईत, थेट विधीमंडळात गेला, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT