Goa : अल्पवयीन बहिणींचा वॉर्डबॉयकडून विनयभंग! Saam Tv
देश विदेश

Goa : अल्पवयीन बहिणींचा वॉर्डबॉयकडून विनयभंग!

आईला लिफ्टमधून नेत असताना संशयित गोविंद याने याचा फायदा उठवत या मुलींना हात लावून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने मोबाईलवरून या मुलींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला.

अनिल पाटील

गोवा : गोव्यात महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे गुन्हे वाढू लागले आहेत. म्हापसा येथील जिल्हा इस्पितळातील एका कर्मचाऱ्याने दोघा अल्पवयीन बहिणींचा विनयभंग केल्याने खळबळ माजली आहे. राज्यातील महिला असुरक्षित होत असल्याचा आरोप विरोधकांकडून व महिला संघटनांकडून होत असताना हा प्रकार घडल्याने लोकांमध्ये संताप व्यक्त होऊ लागला आहे. सार्वजनिक ठिकाणांबरोबरच आता इस्पितळात जाणेही असुरक्षित बनत असल्याची भावना महिलांमध्ये होऊ लागली आहे.

हे देखील पहा :

उत्तर गोव्यातील म्हापसा जिल्हा इस्पितळातील वॉर्ड बॉय गोविंद सावंत (४७) याने १७ व १३ वर्षाच्या मुलींचा इस्पितळच्या लिफ्टमध्ये विनयभंग केल्याची तक्रार म्हापसा पोलिसांत दाखल झाल्यानंतर याप्रकरणी गोविंद याला अटक झाली आहे. या मुलींच्या आईला इस्पितळात उपचारासाठी आणण्यात आले होते. तिला उपचारासाठी नेत असताना तिच्यासोबत दोन अल्पवीयन मुली होत्या.

आईला लिफ्टमधून नेत असताना संशयित गोविंद याने याचा फायदा उठवत या मुलींना हात लावून त्यांचा विनयभंग केला. त्यानंतर त्याने मोबाईलवरून या मुलींशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी भादंसं कलम ३५४, ३५४अ, ३५४ ड व बाल कायदा तसेच पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १० खाली गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलींची आई इस्पितळात उपचारासाठी दाखल असल्याने त्या वारंवार येत होत्या. त्यावेळी ज्या वॉर्डमध्ये या मुलींची आई उपचार घेत होती तेथे त्या भेट देत होत्या. अनेकदा संशयिताने या मुलींवर पाळत ठेवली होती व तो त्यांना इस्पितळच्या लिफ्टमध्ये गाठून विनयभंग करत होता, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. हा विनयभंगाचा प्रकार २३ ते २५ सप्टेंबर या दरम्यान घडला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

Prataprao Jadhav : मुंबई गुजरातची राजधानी होती, शिंदे सेनेच्या प्रतापराव जाधवांचे वक्तव्य

Politics: 'छत्रपती संभाजी राजेंनी १६ भाषा शिकल्या, ते काय मु**'; शिंदे गटातील आमदाराची जीभ घसरली

Ashadhi Ekadashi: आज आषाढी-देवशयनी एकादशीला करा हे सोपे उपाय; जीवनातील समस्या होतील पटकन दूर

Monsoon Alert : पुण्याला रेड अलर्ट, घाटमाथ्यावर धो धो कोसळणार, पुढील ५ दिवस आषाढधारा, वाचा हवामानाचा अंदाज

SCROLL FOR NEXT