Goa Congress
Goa Congress Saam Tv
देश विदेश

गोव्यात काँग्रेसला मोठा झटका, नऊ आमदार भाजपमध्ये जाण्याची शक्यता

अनिल पाटील

पणजी: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या सत्तानाट्याला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्रातील सत्तानाट्यानंतर आता गोव्यातील काँग्रेस आमदारांमध्ये मोठी फूट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नऊ आमदार भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसने मात्र या बातमीचे खंडन केले आहे. गोव्यात काँग्रेसचे ११ आमदार आहेत. ९ आमदार भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसकडे (Congress) फक्त दोनच आमदार राहतील.

गोव्यात काँग्रेसचे अनेक आमदार फुटून भाजपमध्ये (BJP) येतील या बातमीचे काँग्रेसच्या प्रभारींनी खंडन केले आहे. या सर्व बातम्या अफवा असल्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव म्हणाले. पणजीतील एका हॉटेलमध्ये पक्षाच्या ११ आमदारांसोबत शनिवारी झालेल्या बैठकीचा या अंदाजाशी काहीही संबंध नसल्याचेही काँग्रेस नेत्यांनी सांगितले. सोमवारपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी ही बैठक झाली.

काँग्रेसमध्ये नव्याने निवडून आलेले ८ आमदार

'आमचे ११ पैकी ८ आमदार नवीन आहेत. फ्लोअर मॅनेजमेंटबाबत आज बैठक झाली. आमच्या ज्येष्ठ आमदारांनी नवीन आमदारांशी चर्चा केली आणि मला आशा आहे की सोमवारपासून काँग्रेस अपयशी ठरलेल्या या सरकारच्या विरोधात जनतेचे प्रश्न मांडेल, असं प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

गोवा विधानसभा एकूण सदस्य संख्या ४०

सत्ताधारी भाजप आणि इतर २५

भाजप २०

मगोप २

अपक्ष ३

विरोधी काँग्रेस सह इतर १५

काँग्रेस ११

आप २

आरजी १

गोवा फॉरवर्ड पक्ष १

यापैकी ८ जण फुटण्याची शक्यता

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Delhi Liquor Policy Case: ईडीकडून दाखल केलेले साक्षीदार भाजपशी संबंधित; SC मध्ये केजरीवालांनी दिलं उत्तर

Dhule Car Accident : वाहनावरील ताबा सुटला अन् कार कोसळली पुलाखाली; ४ जण गंभीर जखमी

Onion Export News | कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

Lipstick Hacks: ओठांवर लिपस्टिक जास्त वेळ टिकावी असं वाटतंय? वापरा या टीप्स

CM Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे काही तासांपासून कुणालाच का भेटले नाहीत? नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT