Arvind Kejriwal announces Goa First alliance with AAP and GFP saam tv
देश विदेश

अमित शहा मुंबई दौऱ्यावर असतानाच केजरीवालांनी खेळला मोठा गेम; नव्या युतीनं वाढवली भाजपसह काँग्रेसची डोकेदुखी

Goa Politics: अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टी आणि गोवा फॉरवर्ड पार्टीने आगामी गोवा निवडणुकीसाठी ‘गोवा फर्स्ट’ या नव्या आघाडीची घोषणा केली आहे. भाजप आणि काँग्रेसला पर्याय देण्याचा दावा या आघाडीकडून करण्यात आला आहे.

Bharat Jadhav

भाजप नेते अमित शहा आज मुंबई दौऱ्यावर आहेत. मात्र त्याचदरम्यान अरविंद केजरवाल यांनी एक राजकीय डाव टाकत भाजपचं टेन्शन वाढवलंय. नुसतं भाजप नाही तर कधीकाळी मित्र पक्ष असलेल्या काँग्रेसचीही डोकेदुखीही वाढवलीय. गोव्यात भाजपला धोबी पछाड करण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी एक नवी युती केली. आम आदमी पार्टी (AAP) आणि गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP) यांनी गोव्यातील आगामी निवडणुकांसाठी युतीची घोषणा केलीय.

या युतीचे नाव 'गोवा फर्स्ट' असणार आहे, असं आप'चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितलं. गोव्याच्या राजकारणात भाजप आणि काँग्रेसला एक सक्षम पर्याय म्हणून ही युती उदयास येईल, असेही केजरीवाल म्हणालेत. नव्या आघाडीमुळे गोव्याच्या आगामी निवडणुकीतील राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

'लोकांकडे भाजप किंवा काँग्रेसशिवाय दुसरा पर्याय नव्हता'

नव्या युतीची घोषणा करताना केजरीवाल म्हणाले की, गोव्यातील जनता बऱ्याच काळापासून राज्यातील राजकीय परिस्थितीचे निरीक्षण करत आहे. त्यांना असे वाटत होते की त्यांच्याकडे कोणताही पर्याय उपलब्ध नाही. कारण आतापर्यंत त्यांना भाजप आणि काँग्रेस यांच्यापैकीच एकाची निवड करावी लागत होती. त्यांनी दोन्ही पक्षांमध्ये परस्पर समझोता झाल्याचा आरोप केला. गोव्यातील जनतेला आता बदल हवा आहे.

भाजप व काँग्रेस या दोघांपासूनही वेगळ्या अशा पर्यायाची गरज आहे, असं केजरीवाल म्हणालेत. 'गोवा फर्स्ट' हा नेमका तोच पर्याय म्हणून समोर आला आहे. भाजपचा पराभव करू इच्छिणारे लोक 'गोवा फर्स्ट'ला मतदान करू शकतात. तसेच, काँग्रेसबाबत निराशा झालेल्यांसाठीही ही आघाडी एक पर्याय उपलब्ध करून देते.

आपल्या ताकदीवर सरकार बनवणार - केजरीवाल

'गोवा फर्स्ट' आपल्या स्वतःच्या बळावर निवडणूक जिंकेल आणि गोव्यात सरकार स्थापन करेल. या आघाडी बाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की ही आघाडी विश्वासार्ह आणि प्रामाणिक असेन आणि गोव्यातील जनतेप्रती कटिबद्ध आहे. त्यांच्या हितासाठी काम करेल. पहिल्यांदाच गोव्यातील मतदारांसमोर भाजप किंवा काँग्रेस नसलेला एक राजकीय पर्याय उपलब्ध झाला आहे. केजरीवाल यांच्या मते, जनविश्वासाच्या जोरावर निवडणूक जिंकणे आणि सरकार स्थापन करणे हे 'गोवा फर्स्ट'चे उद्दिष्ट असल्याचं केजरीवाल म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Honey and Garlic Benefits: मधासोबत लसूण खाण्याचे 5 जबरदस्त आरोग्यदायी फायदे; शरीर राहील निरोगी

Maharashtra News Live Update: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणानंतर ठाण्यात सर्वपक्षीय नेते एकवटले

Banana : केळी खाल्ल्यानंतर किती लिटर पाणी प्यावे? ९०% टक्के लोक करतात ही चूक, आताच घ्या जाणून

Petrol Price Hike : मोठी बातमी! पेट्रोल ५ रुपयांनी तर डिझेल ३ रुपयांनी महागले; 'या' पंपांवर वाढले दर

राजकारणात खळबळ! माजी मुख्यमंत्र्यांना जोरदार झटका; माजी आमदारासह महत्वाच्या ३ नेत्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT