Girls Stunt On Bike Viral Video Saamtv
देश विदेश

Viral Video: चालू गाडीवर पोरींनी केला प्रताप! घट्ट मिठी, किसिंग अन् जीवघेणा स्टंट; VIDEO पाहून नेटकरी संतापले

Girls Kiss On Bike Viral Video: आता तर कहरचं! पोरींचा प्रताप पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल | व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल...

Gangappa Pujari

Girls staut And Romance On Bike: सध्याचे युग हे सोशल मीडियाचे युग आहे. जगभरात घडणाऱ्या अनेक घटना एका क्षणात सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र पोहोचतात. अनेकदा सोशल मीडियावर अशाही काही घटना समोर येतात, जे पाहून कधी आश्चर्याचा धक्का बसतो तर कधी डोक्याला हात लावण्याचीही वेळ येते.

सध्या अशाच एका व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधले आहे. ज्यामध्ये चालू गाडीवर दोन तरुणींनी असा काही प्रताप केला, जो पाहून तुम्हीही डोक्याला हात लावालं. सध्या या व्हायरल व्हिडिओवर नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. काय आहे या व्हायरल व्हिडिओची कथा, चला जाणून घेवू... (Latest Marathi News)

सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत येण्यासाठी सध्याची तरुणाई कधी काय करेल याचा काही नेम नाही. कधी बाईकवर स्टंटबाजी करत तर कधी रस्त्यावर डान्स करत हे तरुण चर्चेत येत असतात. मात्र अनेकदा असे स्टंट जीवावरही बेतू शकतात. सध्या अशाच दोन तरुणींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

दोन तरुणी चालत्या बाईकवर बसून स्टंट करताना दिसत आहेत. ज्यामध्ये त्यांनी चालत्या बाईचा हँडलही मोकळा सोडून दिला आहे. यामधील एक तरुणी बाईकवर उलटी बसली आहे. एवढचं नाही तर या तरुणी स्टंटबाजी करत एकमेकींना किसही करत आहेत. तसेच त्यानंतर मिठीही मारत आहेत. हा सगळा प्रकार मागून येणाऱ्या एका वाहन चालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. (Latest News)

या व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे हे समोर आले नसले तरी त्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. विशेष म्हणजे स्टंट करीत असताना दोन्ही मुलींनी गळाभेट आणि किस करीत असताना बाईकचा चांगला बॅलेन्स केला आहे. हा सगळा स्टंट करीत असताना मुलींनी अजिबात बाईकचा हँडल पकडलेला नाही. या व्हिडीओने अनेकांना हैराण केलं आहे.

दरम्यान, या व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त करत तरुणींना खडेबोल सुणावले आहेत. एका व्यक्तीने यावर दोघींनाही पोलिसांच्या ताब्यात द्या, अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर आणखी एकाने अशाच स्टंटबाजीमुळे अपघात होतात, असे म्हणत मुलींना खडेबोल सुणावले आहेत. इतकेच नव्हेतर अनेकांनी या तरुणींच्या धाडसाचे कौतुकही केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नाशिकमध्ये तब्बल 3 लाख दुबार मतदार; बोगस मतदारविरोधात शिंदेसेनाच मैदानात

Election Commission: नगर परिषद, नगर पंचायती निवडणूक; उमेदवारांना किती पैसे खर्च करता येतील?

Fact Check : मुंबईतील सोसायट्यांमध्ये फिरतंय भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Junnar leopard Attack : बिबट- माणसांचा संघर्ष उफाळला, पुण्यात बिबट्यानं घेतला 60 जणांचा बळी; नागरिक म्हणतात गोळ्याच घाला

Gangster reels : रिलस्टार बनतायेत गँगस्टर? दहशतीच्या रिल्स बनवाल जेलमध्ये जाल, VIDEO

SCROLL FOR NEXT