Garba News Gujrat Saam TV
देश विदेश

Crime News : मुलीने गरबा स्पर्धेत जिंकली २ बक्षिसे, वडिलांची बेदम मारहाण करत हत्या, नेमकं काय आहे प्रकरण?

Crime News in Gujrat : पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे.

प्रविण वाकचौरे

Gujrat Crime News :

गुजरातमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गरबा स्पर्धेतील बक्षिसावरुन झालेल्या क्षुल्लक वादातून एका व्यक्तीची बेदम मारहाण करत हत्या करण्यात आली आहे. पोरबंदरमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. (Latest News)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, पोरबंदर येथील एका गरबा स्पर्धेत कृपाली ओडेदरा नावाच्या 11 वर्षीय मुलीने भाग घेतला होता. या स्पर्धेत तिला दोन प्रकारात प्रथम क्रमाकांचं पारितोषिक मिळालं होते. मात्र मुलीची आई माली तिला घेण्यासाठी कार्यक्रमच्या ठिकाणी पोहोचली, तेव्हा मुलीला एकच बक्षिस दिलं गेल्याचं लक्षात आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आयोजकांची ही कृती माली यांना खटकली. यावर त्यांनी आक्षेप घेतला. आयोजक राजू केसवाला यांच्याकडे जाऊन त्यांनी याबाबत विचारणा केली. मात्र केसवाला यांनी कार्यक्रम संपल्याने आता काही करता येणार नाही, असं उद्धटपणे सांगितलं. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद सुरू झाला.

केसवाला यांच्यासोबत सहआयोजक राजा कुचडिया यांच्या पत्नी देखील माली यांच्याशी वाद घालत होत्या. आयोजकांनी माली यांना घटनास्थळावरून निघून जाण्यास सांगितले. त्यांना जीवे मारण्याची धमकीही दिली गेली. (Crime News)

घरी पोहोचल्यानंतर रात्रीच्या वेळी माली या पती सरमन यांच्यासोबत घराबाहेर बसल्या होत्या. रात्री २.३० वाजेच्या सुमारास चार दुचाकीवरून काही लोक तेथे आले आणि त्यांनी सरमन यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गरबा स्थळी नेले आणि तेथे त्यांना पुन्हा मारहाण केली.

बराच वेळ होऊनही सरमन घरी न पोहोचल्याने माली यांनी पोलिसात धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळ गाठलं तेव्हा सरमन जखमी अवस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केलं.

याप्रकरणी पोलिसांनी केसवाला, कुचडिया, त्यांच्या पत्नी आणि काही अज्ञात लोकांविरुद्ध खून, अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CM Post Offer: शंभर आमदार आणा अन् मुख्यमंत्री व्हा! दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना सीएम पदाची ऑफर

Maharashtra Live News Update: कल्याण रेल्वे स्थानक परिसरात मृत महिलेचा आढळला

Viral Video: इच्छा असेल तर...; विद्यार्थ्याने उत्तरपत्रिकेवर चिकटवली २०० रुपयांची नोट, लिहिलेली शायरी वाचून पोट धरून हसाल

Jio Prepaid Plan: खुशखबर! 200GB डेटा आणि 90 दिवसांची वैधता अन्...; Jio युजर्ससाठी 'ही' खास ऑफर माहितीये का?

Accident News : कल्याणमध्ये अपघाताचा थरार! रिंग रोड बनला स्टंटबाजांचा अड्डा, भरधाव कार व्यवसायिकाला धडकली

SCROLL FOR NEXT