देश विदेश

Crime News: प्रेम, विश्वास आणि विश्वासघात! साखरपुड्यानंतर तरुणीवर बलात्कार; हुंडा न मिळाल्याने वराने लग्न मोडले

Ghaziabad Crime News: गाझियाबादमध्ये धक्कादायक प्रकार घडला. पोलीस ठाण्याच्या हद्दीत तरुणीवर तिच्याच होणाऱ्या नवऱ्याने लैंगिक अत्याचार केले. कोट्यवधींच्या हुंड्याची मागणी न मानल्याने आरोपीने लग्नाला नकार देत अत्याचार केल्याचा आरोप आहे.

Dhanshri Shintre

  • गाझियाबादमध्ये होणाऱ्या नवऱ्यावर बलात्काराचा गंभीर आरोप

  • ६० लाख रुपयांचा हुंडा न दिल्याने लग्न रद्द केल्याचे उघड

  • पोलिसांनी बलात्कार आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला

  • एसीपी रितेश त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू

गाझियाबाद शहरात घडलेल्या एका धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे. कोतवाली नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीवर तिच्याच होणाऱ्या नवऱ्याने बलात्कार केल्याची तक्रार दाखल झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वराला कोट्यवधी रुपयांचा हुंडा न मिळाल्यामुळे लग्नाला नकार दिला असून, त्याआधी महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.

पीडित तरुणीने गाझियाबाद पोलीस आयुक्तांकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपी अंकुर चौहानविरुद्ध बलात्कार आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तक्रारीनुसार, कोतवाली नगर परिसरातील तरुणीचे लग्न साहिबाबादच्या करहेरा कॉलनीतील अंकुर चौहानसोबत निश्चित झाले होते. मुलगा आणि मुलीच्या कुटुंबांमध्ये ६० लाख रुपयांचा हुंडा ठरल्याचं सांगितलं जातं.

मुलीच्या वडिलांनी लग्नासाठी एक महागडी कार देखील बुक केली होती. मात्र, २४ ऑक्टोबर रोजी अंकुरच्या कुटुंबियांनी मुलीच्या वडिलांना मोहन नगरमधील एका मॉलमध्ये येण्यास सांगितले. दुपारी दोनच्या सुमारास मुलीचे परिवार आणि नातेवाईक तिथे पोहोचले. तिथे अंकुर, त्याची आई, काका आणि मामा उपस्थित होते. सर्वांसमोरच अंकुरने लग्न करण्यास नकार दिला. जेव्हा मुलीच्या कुटुंबाने कारण विचारले तेव्हा त्याने सांगितले की तिचं कुटुंब त्याच्या मागण्या पूर्ण करत नाही, त्यामुळे तो लग्न करणार नाही.

महिलेच्या म्हणण्यानुसार, लग्न रद्द होण्याच्या काही आठवडे आधी म्हणजे १ ऑक्टोबर रोजी अंकुर चौहान तिला नोएडा सेक्टर ७० मधील रुमासिया रेसिडेन्सी सोसायटीच्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला आणि लग्नाचे कारण सांगून तिच्यावर जबरदस्ती शारीरिक संबंध ठेवले. काही दिवसांत लग्न होणार असल्यामुळे तिने ही गोष्ट आपल्या कुटुंबाला सांगितली नव्हती. पण नंतर अचानक अंकुर व त्याच्या नातेवाईकांनी ६० लाख रुपयांच्या हुंड्याची मागणी पुन्हा पुढे ठेवली आणि ती पूर्ण न झाल्याने लग्न मोडले.

या घटनेबाबत एसीपी कोतवाली रितेश त्रिपाठी यांनी सांगितले की, पीडितेच्या तक्रारीच्या आधारे ३० ऑक्टोबर रोजी अंकुर चौहानविरुद्ध बलात्कार आणि हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत प्रकरण दाखल करण्यात आले असून प्रकरणाची सविस्तर चौकशी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: राज ठाकरे इंडिया आघाडीत येणार? राज्यात नवं राजकीय समीकरण?

Mumbai Train : मुंबई लोकलमध्ये महिला प्रवाशांची छेड; आरोपी तरुणाला चोप, फरफटत नेलं, VIDEO

रात्री उशिरा चहा पिण्याची सवय आरोग्यासाठी फायदेशीर की घातक? जाणून घ्या

Maharashtra Drought : शेतकऱ्यांकडून कर्जवसुली नाही, नवीन बांधकामांवर निर्बंध; राज्य सरकारचे मोठे निर्णय

Chanakya Niti : बायकोने नवऱ्याला न विचारता चुकूनही करू नयेत ‘या’ ४ गोष्टी; नाहीतर नात्यात येईल दुरावा

SCROLL FOR NEXT