देश विदेश

Shocking: नात्याला काळिमा! भावाने केला बहिणीवर बलात्कार अन् टेरेसवरून दिले फेकून, ८ वर्षांपासून करत होता अत्याचार

Ghaziabad Crime News: गाजियाबादच्या मोदीनगर परिसरात १७ वर्षांच्या विद्यार्थिनीवर चुलत भावाने बलात्कार करून छतावरून फेकल्याने परिसरात खळबळ उडाली. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

Dhanshri Shintre

  • मोदीनगर परिसरातील गावात १७ वर्षीय मुलीवर चुलत भावाचा बलात्कार.

  • विरोधानंतर आरोपीने मुलीला छतावरून खाली फेकले.

  • आठ वर्षांपासून चालू होता सततचा अत्याचार.

  • आरोपी अटकेत, पीडितेला उपचारासाठी मेरठला हलवले आहे.

गाजियाबादच्या मोदीनगर परिसरातील एका गावात घडलेल्या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या गावातील १७ वर्षीय विद्यार्थीनी आपल्या घराच्या टेरेसवर झोपलेली असताना तिच्या चुलत भावाने तिच्यावर बलात्कार केला. आठ वर्षांपासून हा आरोपी तिला धमकावून सतत बलात्कार करत होता. विरोध केल्यावर आरोपीने विद्यार्थिनीला टेरेसवरून खाली फेकून दिले आणि घटनास्थळावरून फरार झाला.

ही घटना २० ऑक्टोबर रोजी रात्री घडली. मोदीनगरमध्ये एका गावात एक व्यक्ती कुंटूंबासोबत राहत होता. पीडितेच्या कुटुंबाने सांगितले की त्यांची १७ वर्षांची मुलगी इंटरमिजिएटची विद्यार्थिनी आहे. ती मुलगी रात्री टेरेसवर झोपली होती. त्यानंतर अचानर मुलगी टेरेसवरून खाली पडली.

मुलीच्या कुटुंबीयांनी आरडाओरड ऐकून तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तिची प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढे मेरठला हलवावे लागले. शुद्धीवर आल्यानंतर विद्यार्थिनीने घडलेली घटना सांगितली की, झोपेत असताना तिच्या आत्याचा मुलगा आलेला आणि त्याने जबरदस्ती केली. मुलीने विरोध केल्यावर मारहाण करून त्याने टेरेसवरून खाली फेकल्याचे तिने सांगितले.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी सांगितले की आरोपी सतत धमक्या देत तिला आणि तिच्या वडिलांना, भावाला मारण्याची भीती दाखवून गैरप्रकार करत होता. समाजाच्या भीतीमुळे तिने आठ वर्षांपासून ही गोष्ट कुटुंबीयांना सांगितली नव्हती. वडिलांनी केलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीवरून रहिवासी आरोपी कृष्णाला गाजियाबादला ताब्यात घेतले आहे. विद्यार्थिनीची प्रकृती सुधारल्यावर तिचे बोलणे ऐकले जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

SCROLL FOR NEXT